Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

mosami kewat by mosami kewat
July 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
       
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला पाठिंबा देण्यासाठी दिनांक २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पुणे शहर यांच्या वतीने पुणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार असून, विविध सामाजिक, विद्यार्थी, कामगार व लोकशाहीवादी संघटनांनी या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले. या दिवशी पुणे शहरात भव्य संविधानिक जनआंदोलन व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डेक्कन येथून प्रारंभ होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पुणे स्टेशन येथे रॅलीचा समारोप होईल. ही रॅली पूर्णपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत, शांततापूर्ण, लोकशाही मार्गाने आणि कायद्याचा सन्मान राखून काढण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा, जबरदस्ती किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कृत्य करण्यास वंचित बहुजन आघाडीचा स्पष्ट विरोध असल्याचेही स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील सर्व लोकशाहीवादी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटना, व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्व नागरिकांना पुन्हा एकदा नम्र आवाहन करण्यात येते की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी  महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ अनिल आण्णा जाधव, ॲड. सर्वजीत बनसोडे, ॲड. अरविंद तायडे, ऋषिकेश नांगरे पाटील, सागर आल्हाट, दिपक ओवोळ, विशाल गवळी, नवनीत अहिरे, प्रज्योत गायकवाड, लोंढे विराज, किरण सैदाने, राहुल भोसले, राहुल दहीरे, स्वप्नील वाघमारे, अभिजित बनसोडे, अजित वाघमारे, श्रीकांत चौगुले, राहुल दहीरे, परशुराम बनसोडे, अरविंद कांबळे, प्रमोद कदम, ओंकार कांबळे, परशुराम बनसोडे, प्रदीप कांबळे, प्रभाकर व सचिन कलाधर आदी उपस्थित होते.

Tags: Jantar MantarMaharashtraNEETPolitical
Previous Post

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home