Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

mosami kewat by mosami kewat
July 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !
       
मुंबई : दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्या विरोधात दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून या बंद मध्ये जनतेने व सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व डाव्या पक्षांनी केले आहे.

दि. २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. डाव्या पक्षांनाही या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाकप, माकप, शेकाप, भाकप (माले), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या पक्षांची तातडीची ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली व २३ जुलै रोजीचा बंद वंचित बहुजन आघाडी, डावे पक्ष व सर्व लोकशाहीवादी पक्ष, संघटनांनी एकत्रितपणे यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या पंचवीस दिवसांपासून दिल्ली येथील जंतर-मंतरवर नीट पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा; तसेच शिक्षणातील अनागोंदी व भ्रष्टाचार थांबविण्यात यावा या मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके व विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सोनम वांगचुक यांना हुकूमशाही पद्धतीने पहाटेच्या वेळी अटक करून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला केला.

दि. २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशभरातून लाखोच्या संख्येने विद्यार्थी-युवक व पालक दिल्लीत पोहोचले होते. यावेळी केंद्र सरकारच्या आदेशाने दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांवर निर्दयपणे बेछूट लाठी हल्ला केला आहे. त्यात शेकडो तरुण जखमी झाले आहेत. अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतरही आंदोलकांना मारहाण करण्यात आली आहे.

याचा निषेध म्हणून २३ जुलै रोजी ही बंदची हाक दिली असून राज्यातील इंडिया आघाडी मधील सर्व लोकशाहीवादी पक्ष व जनसंघटनांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या पक्षांच्या वतीने भाई जयंत पाटील, कॉ. अॅड. सुभाष लांडे, कॉ. डॉ. अजित नवले, कॉ. उदय भट, कॉ. किशोर ढमाले, किशोर कर्डक यांनी केले आहे.

Tags: Dharmendra PradhanJantar MantarMaharashtraMaharashtra BandhNEET Paper LeakPoliticalPrakash Ambedkar
Previous Post

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

Next Post

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

Next Post
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home