Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

E10 पेट्रोलचा पर्याय कायम ठेवा आणि इंधनाचे दर कमी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
E10 पेट्रोलचा पर्याय कायम ठेवा आणि इंधनाचे दर कमी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
       
 चांदूर बाजार : २०२३ पूर्वी उत्पादित झालेल्या वाहनधारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी देशातील सर्व पेट्रोल पंपांवर E20 सोबत E10 पेट्रोलचा कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच E10 पेट्रोल, E20 पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी, चांदूर बाजार यांच्या वतीने आज पंतप्रधान, भारत सरकार यांना उद्देशून तहसीलदार, चांदूर बाजार यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०२३ पूर्वीची बहुतांश वाहने E10 इंधन लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून अशा वाहनांमध्ये दीर्घकाळ E20 पेट्रोलचा वापर केल्यास इंधन कार्यक्षमतेत घट, मायलेज कमी होणे, वाहनाच्या इंधन प्रणालीतील काही भागांची झीज वाढणे आणि देखभाल खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याने लाखो वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट होऊनही पेट्रोल व डिझेलच्या दरात अपेक्षित कपात झालेली नाही. E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याची किंमत E10 पेक्षा कमी असावी, तसेच कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने E10 पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी सुरज र. चव्हाण (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी) तोषल नव्हाळे (ता. महासचिव) हरिदास इंगळे, आकाश उके, सुधीर तायडे (ता. उपाध्यक्ष) पवन मनोहरे (ता.अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा), आकाश वानखडे, शुभम गाठे, धीरज तायडे, सागर मोहेकर, विकास मनोहरे, सिद्धार्थ तायडे, राहुल हिवराळे, भारत तायडे, किरण वानखडे आणि माणिक गजभे उपस्थित होते.

Tags: amravatiE10MaharashtraPetrolVanchit Bahujan Aghadiअमरावती
Previous Post

मनमाडमध्ये घरपट्टी आणि व्यावसायिक करात ५०% सूट देण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; रबाळे येथील आदिवासीपाड्यातील शौचालय दुरुस्तीला सुरुवात!

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; रबाळे येथील आदिवासीपाड्यातील शौचालय दुरुस्तीला सुरुवात!

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; रबाळे येथील आदिवासीपाड्यातील शौचालय दुरुस्तीला सुरुवात!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीत लोकशाहीचा नवा अध्याय, ३० जुलैला पक्षांतर्गत निवडणुका; प्रदेशाध्यक्षपदासाठी तिरंगी लढत
बातमी

वंचित बहुजन आघाडीत लोकशाहीचा नवा अध्याय, ३० जुलैला पक्षांतर्गत निवडणुका; प्रदेशाध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

by mosami kewat
July 20, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रवासात प्रथमच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद आणि राज्य कार्यकारिणी सदस्यपदासाठी पक्षांतर्गत निवडणुका होत असून, पक्षांतर्गत लोकशाही...

Read moreDetails
‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या नाऱ्यांनी जंतर मंतर दणाणले; लाखो युवकांचा दिल्लीत एल्गार

‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या नाऱ्यांनी जंतर मंतर दणाणले; लाखो युवकांचा दिल्लीत एल्गार

July 20, 2026
स्मार्ट मीटर हटवा, बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीचे मुर्तिजापूरमध्ये निवेदन

स्मार्ट मीटर हटवा, बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीचे मुर्तिजापूरमध्ये निवेदन

July 20, 2026
पुरी येथील मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार

पुरी येथील मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार

July 20, 2026
सावधान! शाळांच्या ५०० मीटर आवारात कॅफीनयुक्त पेये विकल्यास अन्नसुरक्षा कायद्यानुसार सक्त कारवाई

सावधान! शाळांच्या ५०० मीटर आवारात कॅफीनयुक्त पेये विकल्यास अन्नसुरक्षा कायद्यानुसार सक्त कारवाई

July 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home