Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

पुणे : मावळ तालुक्यात ४ ते ७ जुलै २०२६ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे भात, भाजीपाला, फळबागा तसेच ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, तसेच पंचनाम्यांची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या वतीने मावळ तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. (Crop Loss Survey)

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने पंचनामे पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित केली असली तरी मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचनाम्यांची मुदत वाढविण्यात यावी, उर्वरित गावांतील पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावेत आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Also Read : NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट

यावेळी तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (Crop Loss Survey)

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे, मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, युवा अध्यक्ष संदीप कदम, युवा महासचिव अक्षयदादा साळवे, महिला अध्यक्षा वृषाली वीरगुर्जर, महिला उपाध्यक्षा सुनिता कदम, महिला संघटक सुजाता गायकवाड तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते किसन गायकवाड उपस्थित होते.

Tags: AgriculturalCrop DamageCrop Loss SurveyFarmer IssuesMaharashtraMonsoonPune Monsoon
Previous Post

NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट

Next Post

जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘लाँग मार्च’: ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

Next Post
जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार 'लाँग मार्च': ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार 'लाँग मार्च': ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार 'लाँग मार्च': ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा
बातमी

जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘लाँग मार्च’: ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

by mosami kewat
July 16, 2026
0

श्रीगोंदा : भटक्या विमुक्त आदिवासी समाजातील नागरिकांना कायदेशीर जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाखल्यांपासून...

Read moreDetails
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 16, 2026
NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट

NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026
स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा

July 16, 2026
राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित

राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित

July 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home