Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

mosami kewat by mosami kewat
July 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात उघडकीस आलेल्या कथित सिंथेटिक दूध निर्मिती प्रकरणामुळे राज्यातील अन्नसुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानाअंतर्गत भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाया सुरू असून, राज्यातील भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त कारवाईत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात कृत्रिम दूध तयार करून त्याचा पुरवठा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Bhoom synthetic milk racket)

प्राथमिक अंदाजानुसार, निकृष्ट दर्जाच्या दूध पावडरच्या आधारे सुमारे 23 लाख लिटर कृत्रिम दूध तयार करण्यात आले असून, त्याची बाजारातील किंमत 9 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रत्येक 100 लिटर शुद्ध दुधामध्ये सुमारे 10 लिटर सिंथेटिक दूध मिसळून बाजारात पुरवठा केला जात असल्याचा संशय आहे. या प्रमाणानुसार, राज्यभरात 2.3 कोटी लिटरपेक्षा अधिक भेसळयुक्त दूध ग्राहकांपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता तपासली जात आहे. (Bhoom synthetic milk racket)

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कृत्रिम दूध नैसर्गिक दिसावे आणि त्यातील फॅटचे प्रमाण कायम राहावे यासाठी डिटर्जंट पावडर, पाम तेल आणि निकृष्ट दर्जाच्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या भेसळयुक्त दुधाचे सातत्याने सेवन केल्यास यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा धोका अधिक गंभीर मानला जातो. (Bhoom synthetic milk racket)

या प्रकरणात सात जणांविरोधात कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, सर्व आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे. त्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी 61 पोती संशयित भेसळयुक्त दूध पावडर जप्त केली. प्राथमिक चौकशीत ही पावडर भूम परिसरातील अनेक डेअरी युनिट्सना पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. याशिवाय काही दूध संकलन केंद्रांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असण्याची शक्यता तपासली जात असून, हा संपूर्ण व्यवहार जनावरांच्या खाद्याच्या नावाखाली सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Bhoom synthetic milk racket

दरम्यान, अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार, जर ही भेसळ मानवी जीवाला धोकादायक असल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित आरोपींना 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता असून, राज्यातील दूध पुरवठा व्यवस्थेवरही यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Tags: Bhoom synthetic milk racketDharashivDharashiv milk racketFDA Maharashtra raidFood and Drug Administration MaharashtraMaharashtraMaharashtra fake milkOsmanabad synthetic milkSafe Food Safe MaharashtraTukaram Mundhe
Previous Post

TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ
बातमी

भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

by mosami kewat
July 14, 2026
0

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात उघडकीस आलेल्या कथित सिंथेटिक दूध निर्मिती प्रकरणामुळे राज्यातील अन्नसुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले...

Read moreDetails
TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!

TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!

July 13, 2026
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून ‘कॅग’ने ओढले ताशेरे: बजेटपेक्षा ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून ‘कॅग’ने ओढले ताशेरे: बजेटपेक्षा ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च 

July 13, 2026
दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू

दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू

July 13, 2026
वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

July 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home