Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!

mosami kewat by mosami kewat
July 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!
       

मालेगाव : वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच TET पेपर फुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर ४ जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने १२ मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री यांना दिले होते आणि ८ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता.

तो काल संपल्यानंतर आज मालेगावात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, तत्पूर्वी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत सकारात्मकता दर्शवली व १२ मागण्यांपैकी ७ मागण्या मान्य करत उर्वरित मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यावर योग्य कारवाई करण्याची भूमिका मांडली.

मान्य केलेल्या मागण्या ―

१. TET पेपर फुटी प्रकरणी दोषी आढलेल्या लोकांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा. यातील सहभागी व्यक्तींची कुठलीही गय केली जाणार नाही.

२. TET पेपर फुटी नंतर आता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील TET परीक्षा फी आकारली जाणार नाही.

३. रद्द करण्यात आलेल्या TET परीक्षांमध्ये उमेदवारांना कितीही वेळा TET परीक्षेला बसता येईल. त्यासाठी विद्यार्थी यांना कोणतीही वयोमर्यादा असणार नाही.

४. शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य आणि ज्येष्ठ शिक्षकांना केवळ टीईटीच्या निकषांवरून पदोन्नती नाकारणे हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सेवेत असलेल्या अशा शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य वर्गातील कामगिरी आणि अनुभवाचे मूल्यमापन करण्यासाठी एक स्वतंत्र पुनरावलोकन प्रणाली सुरू करण्याच्या मागणी संदर्भात महाराष्ट्र सरकार इतर राज्यांमधील या संदर्भात केलेली कार्यवाही याचा अभ्यास करून निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी दिली. पदोन्नती बाबत व कार्यरत शिक्षक यांच्या टीईटी पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने यावर आता भाष्य करणे उचित नाही.

५. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली आहे. पेपर फुटीमध्ये आढलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. टीईटी परीक्षेत  पारदर्शकता आणि शिस्तबद्धता येण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेता येईन का? याची चाचपनी व IBPS संस्थेशी चर्चा सुरू आहे.

६. आर्थिक मागास आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा करण्याचा विषय हा समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाशी निगडित आहे. त्यासाठी त्या विभागाशी विचार विनिमय करून विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदत केली जाईल.

७. जून २०२५ मध्ये झालेल्या TET पात्र उमेदवारांची शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलमुळे  ऑनलाइन व वेळेत राबविण्यात येईल. शिक्षक भरती प्रक्रिया पुढील दोन-तीन महिन्यांत होईल.

८. शिक्षण सेवक पदाचा कालावधी एक वर्ष करण्याबाबत अर्थ विभागाशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.

आदी मागण्यांवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले असून उर्वरित मागण्यांच्या संदर्भात मंत्रालयात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी लवकरच बैठक होणार असल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले.

यावेळी प्रशांत बोराडे (राज्य प्रवक्ते- सम्यक विद्यार्थी आंदोलन), जितरत्न पटाईत, (वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य), मोहीत दामोदर, संघर्षा संखद, अभय सोनकांबळे, भूषण पाईकराव, कमलेश उबाळे, मिहीर गजबे, किरण सैंदाने, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व, शशी पवार, वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक पूर्व, वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, रोहन मगर, प्रज्योत गायकवाड, रवी पगारे, संदीप रामराजे, शंकर खरात, रोहित बागुल, अनिकेत काशीद, आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: Dada BhuseEducationMaharashtraNeet ExamNEET Paper LeakPoliticalSamyak Vidyarthi AndolanVanchit Bahujan Aghadi
Previous Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून ‘कॅग’ने ओढले ताशेरे: बजेटपेक्षा ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च 

Next Post

भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

Next Post
भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

भूममधील कथित सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; लाखो लिटर भेसळयुक्त दुधाचा संशय, राज्यभर खळबळ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 
अर्थ विषयक

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

by mosami kewat
November 6, 2026
0

- संजीव चांदोरकर  अमेरिकेतील राजकीय सत्तेचा लंबक डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फक्त दोन वर्षात दुसऱ्या टोकाला डेमोक्रॅटिक पक्षाकडे सरकू लागला आहे. ...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home