सोलापूर : माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतात मजुरीचे काम करणाऱ्या उषा साठे या अनुसूचित जातीतील महिला मजुराची गोळी झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मृत उषा साठे यांचे कुटुंब मूळचे माळखांबी गावचे असून, मागील १० वर्षांपासून आरोपी सचिन देशमुख याच्याकडे मजुरीचे काम करत होत्या. आरोपीने आर्थिक आणि जातीय मानसिकतेतून एका गरीब महिलेचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे. दलित महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराबाबत शासन आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे उदासीन असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली
या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे. नसरापूर घटनेच्या धर्तीवर हा खटला चालवून ५० दिवसांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासनाने सक्षम सरकारी वकील नेमावा अशी मागणी केली. तसेच, आरोपीने हे शस्त्र कुठून आणले आणि या हत्येच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करून आरोपीची संपत्ती जप्त करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे माढा लोकसभा विभाग जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, सोलापूर चे विनोद इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप, प्रवीण वाघमारे नितीन सरवदे संदीप घाडगे अभिजीत गायकवाड , अक्कलकोट तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट तालुका अध्यक्ष साहिल कांबळे, तालुका उपाध्यक्ष यशवंत शेठ इंगळे, मनोज जगताप, सुनका जाधव, सागर लांडगे, संभाजी कांबळे सावता भोसले, समाधान लांडगे राजू सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






