Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

mosami kewat by mosami kewat
June 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

अकोला : मूर्तिजापूर शहरातील चिखली गेट परिसरात घराचे बांधकाम सुरू असताना उच्चदाबाच्या विद्युत प्रवाहाचा जोरदार शॉक लागून एका युवकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक यांनी प्रसंगावधान दाखवत जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश आकाराम पेंडोरे (रा. सालतवाडा) हा युवक चिखली गेट परिसरात एका घराच्या बांधकामावर काम करत असताना त्याला उच्चदाबाच्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागला. शॉकचा तीव्र धक्का बसल्याने तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Electrocution Incident)

Also Read : लेकीच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

घटनेची माहिती मिळताच संजय नाईक यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी युवकाला स्वतःच्या वाहनातून श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथे तातडीने दाखल केले. सकाळच्या वेळेतील प्रचंड वाहतूक कोंडी असूनही सतत हॉर्न वाजवत रुग्णवाहिकेप्रमाणे मार्ग काढत त्यांनी युवकाला वेळेत रुग्णालयात पोहोचविले.

रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे तसेच डॉ. रेहान चाऊस यांनी तत्काळ उपचार सुरू केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे युवकाचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सध्या आकाश पेंडोरे याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली आहे. (Electrocution Incident)

Also Read : श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

अत्यंत संकटाच्या क्षणी कोणताही विचार न करता तत्परतेने मदतीसाठी धाव घेत माणुसकीचा आदर्श घालून देणाऱ्या संजय नाईक यांच्या या कार्याचे मूर्तिजापूर शहरासह परिसरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि सामाजिक कृतीमुळे एका युवकाला नवजीवन मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Tags: AkolaElectrocution IncidentMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

लेकीच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास पाच हजारांची देणगी!

Next Post

जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील : निलेश देव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home