Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

mosami kewat by mosami kewat
June 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा
       
पुणे : समाज कल्याण आयुक्तालय तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालयाबाहेर दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग उपोषण आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाने जाहीर पाठिंबा दिला आहे. वसतिगृहांमधील समांतर आरक्षण रद्द करून दिव्यांग विद्यार्थ्यांना ५ टक्के आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला भेट देत वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पुणे शहर महासचिव अभिषेक कांबळे यांनी पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर करत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या लढ्यात वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन दिले.

आंदोलनाचे प्रमुख गौरव मालक आणि शुभम नरवडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मागण्यांची माहिती उपस्थितांना दिली. वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतंत्र ५ टक्के आरक्षण मिळावे आणि समांतर आरक्षणाची पद्धत रद्द करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. आंदोलनाच्या मागण्या मान्य करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Tags: PoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

खडकवासला: वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; जे.पी. नगरमधील पथदिवे अखेर सुरू!

Next Post

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!
बातमी

हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

by mosami kewat
August 20, 2026
0

मुंबई : आरएसएस-भाजपने हल्द्वानी मध्ये केलेले 'शुद्धीकरण' हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात केलेले जातीयवादी आणि अस्पृश्यतेचे एक घृणास्पद...

Read moreDetails
नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

August 20, 2026
जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

August 20, 2026
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी-दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी-दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home