सोलापूर : भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजाच्या घरगणना, जनगणना आणि SIR प्रक्रियेसाठी अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी आठ जिल्ह्यांतील ११० गावांमध्ये मुशाफिरी यात्रा काढली होती. या यात्रेच्या समर्थनार्थ भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समिती, सोलापूर शाखेच्या वतीने आज सोलापुरात घरगणनेपासून वंचित राहिलेल्या समुदायांच्या हक्कासाठी मुशाफिरी यात्रेचे आयोजन करून त्यांच्या घरगणना नोंदणीसाठी जोरदार आवाज उठवण्यात आला. या यात्रेला सोलापुरात मोठे आणि तात्काळ यश मिळाले असून, प्रशासनाने दखल घेत तब्बल १२० कुटुंबांची घरगणना पूर्ण केली आहे.
शहरातील नवीन RTO कार्यालयाजवळ (बहुरूपी समाज – ३५ व वैदू समाज – २५ कुटुंबे), कमला नगरजवळील बहुरूपी नगर (बहुरूपी समाज – ४५ कुटुंबे) आणि सोरेगाव (बहुरूपी समाज – १५ कुटुंबे) या भागांत राहणाऱ्या तब्बल १२० भटके-विमुक्त कुटुंबांची अद्यापही घरगणना झाली नव्हती. आज घरगणनेचा शेवटचा दिवस असल्याने या कुटुंबांची नोंद व्हावी, यासाठी सोलापुरात शेकडो बांधवांनी एकत्र येत ही मुशाफिरी यात्रा काढली. (Mushafiri Yatra)
Also Read : सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
या यात्रेनंतर यशवंत फडतरे आणि समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रश्नासंदर्भात निवेदन दिले. “आम्ही माणसं आहोत, गुन्हेगार नाही; आमची प्रशासकीय नोंद व्हावी,” अशी ठाम भूमिका समितीने मांडली.
या निवेदनाची माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक आणि तातडीने दखल घेतली. त्यांनी तात्काळ ही बाब सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली व योग्य त्या सूचना दिल्या. यानंतर मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार संबंधित प्रगणक व जनगणना अधिकाऱ्यांनी तातडीने या वस्त्यांवर धाव घेतली आणि राहिलेल्या सर्व १२० कुटुंबांची घरगणनेत अधिकृत नोंद करून घेतली. (Mushafiri Yatra)
मुशाफिरी यात्रेचा असा तात्काळ आणि सकारात्मक परिणाम मिळाल्यामुळे भटके-विमुक्त वस्त्यांवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक पिढ्यांपासून शासकीय दप्तरी नोंद नसलेल्या या कुटुंबांची आज अधिकृत नोंद झाल्याने त्यांच्या मूलभूत हक्कांचा आणि SIR प्रक्रियेतील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Also Read : नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन
या अभूतपूर्व यशाबद्दल समुदायातील सर्व सदस्यांनी भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या कार्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. या यशस्वी लढ्यात भाई यशवंत फडतरे, मल्लेश सूर्यवंशी, वैशाली बनसोडे, रोहिणी गायकवाड, कीर्तिपाल शिवशरण, मुत्याप्पा भारते, अंजली चितारे, सुगम कांबळे, क्रांती आठवले, सुषमा कांबळे आणि दिपाली राठोड यांच्यासह शेकडो समाजबांधवांचा मोठा सहभाग होता. (Mushafiri Yatra)
घरपट्टी वाढ रद्द करा; अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा – वंचित बहुजन कामगार युनियनचा इशारा
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने मूल्यांकनाच्या नावाखाली नागरिकांवर तिप्पटपेक्षा अधिक घरपट्टी वाढ लादल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन माथाडी...
Read moreDetails






