Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

mosami kewat by mosami kewat
June 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

खडकवासला : वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून फ्लिपकार्ट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरांनुसार भत्त्याचे नियमित पुनर्निर्धारण करावे, या मागणीसाठी आवाज उठवणाऱ्या फ्लिपकार्टच्या १७ डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या आयडी बंद करण्यात आल्या होत्या. (Flipkart Delivery Workers)

त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या आयडी पुन्हा सुरू करण्यास फ्लिपकार्ट व्यवस्थापन तयार नव्हते. त्यामुळे या कामगारांनी वंचित बहुजन युवा आघाडी, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि महासचिव गौतम तायडे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

Also Read : सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

घटनेची माहिती मिळताच राजेंद्र कांबळे आणि गौतम तायडे यांनी तात्काळ नांदेड सिटी येथील फ्लिपकार्ट स्टोअरला भेट देऊन व्यवस्थापनाकडे जाब विचारला. सुरुवातीला व्यवस्थापनाने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेत १७ डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या आयडी तात्काळ सुरू केल्या. तसेच कामगारांच्या पुढील प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या :

– पेट्रोल दरवाढीनुसार भत्त्याचे नियमित पुनर्निर्धारण करणे.

– प्रति किलोमीटर दर ₹१० वरून ₹१८ करणे.

– ऑर्डर रद्द (कॅन्सल) झाल्यास डिलिव्हरी पार्टनरला ठरलेले संपूर्ण शुल्क अदा करणे.

– कामगारांना सन्मानपूर्वक वागणूक देणे.

व्यवस्थापनाने या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने डिलिव्हरी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वंचित बहुजन युवा आघाडीच्या संघर्षामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली. यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे युवा उपाध्यक्ष अमोल बावस्कर, उपाध्यक्ष आनंद ढेंबरे, विकी खंडागळे तसेच मोठ्या संख्येने डिलिव्हरी कामगार उपस्थित होते. (Flipkart Delivery Workers)

Tags: Breaking NewsDelivery PartnersEmployment RightsFlipkart Delivery WorkersKhadakwaslaMaharashtraPune NewsVanchit Bahujan Yuva AghadiWorkers Rights
Previous Post

जनगणनेतून वंचित राहिलेल्या १२० भटके-विमुक्त कुटुंबांची तात्काळ घरगणना; मुशाफिरी यात्रेला सोलापुरात मोठे यश

Next Post

घरपट्टी वाढ रद्द करा; अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा – वंचित बहुजन कामगार युनियनचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी
बातमी

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

by mosami kewat
October 18, 2026
0

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात ही...

Read moreDetails
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

October 18, 2026
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

October 18, 2026
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

October 18, 2026
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home