Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
June 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

सोलापूर : माळशिरस तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसवड–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन अचानक रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 5 जणांना जीव वाचवण्यात यश आले.

मृत सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना हा अपघात घडला. तांदूळवाडी परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट विहिरीत जाऊन पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Also Read : नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन

घटनास्थळी असलेली विहीर पाण्याने पूर्ण भरलेली होती. तसेच विहिरीभोवती कोणतीही संरक्षण भिंत किंवा कठडा नसल्याने वाहन थेट पाण्यात कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, तर प्रशासन आणि बचाव पथकेही घटनास्थळी दाखल झाली. या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Also Read : अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

या दुर्दैवी घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीने शोक व्यक्त करत, अपघाताची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही पक्षाकडून करण्यात आली आहे. पीडित कुटुंबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

Tags: accidentMaharashtrapandharpurSolapur Accident
Previous Post

बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी!

Next Post

जनगणनेतून वंचित राहिलेल्या १२० भटके-विमुक्त कुटुंबांची तात्काळ घरगणना; मुशाफिरी यात्रेला सोलापुरात मोठे यश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर
बातमी

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

by mosami kewat
October 18, 2026
0

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील मध्यवर्ती भागातील अतिशय प्रसिद्ध आणि गर्दीच्या चोरबागान सार्वजनिक दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी एका...

Read moreDetails
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home