Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी!

mosami kewat by mosami kewat
June 15, 2026
in अर्थ विषयक, सामाजिक
0
बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी !

बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी !

       

– संजीव चांदोरकर

देशाची अर्थव्यवस्था बिकट अवस्थेतून जात असल्याची टीका , सत्ताधारी पक्षाचे टीकाकारच करीत नाही आहेत, तर मोदी राजवटीचे अनेक वर्षाचे खंदे समर्थक अर्थतज्ञ करू लागले आहेत.

अर्थव्यवस्थेत मंदी सदृश्य परिस्थिती तयार झाली की पहिला फटका अनौपचारिक क्षेत्राला बसतो. पण सरकार दरबारी मागण्या तर संघटितपणे करू शकतो. ज्या क्षेत्रात , ज्या ठिकाणी संघटित मागण्यासाठी कार्यकर्ते / नेते पुढाकार घेत आहेत त्यांना साथ द्या. कारण शासनाकडे अमर्याद ताकद असते. वित्तीय स्रोत असतात. कायदे , योजना फक्त शासनच बनवू शकतेय.

समांतर पद्धतीने आपण स्वतःपुरते काय करू शकतो असा प्रश्न स्वतःला विचारावयस हवा. कारण जगायचे तर आहे. मुलाबाळांचे भविष्य आहे

१. सर्व प्रथम अत्यावश्यक खर्च कुठले व कोणते खर्च पुढे ढकलू शकतो हे कुटुंबात एकमताने ठरवा. नवरा, बायको, मोठी मुले याना विश्वासात घ्या

२. कोणत्याही परिस्थितीत, होताहोइस्तो खाण्याची सकसता कमी करू नका, दूध, अंडी, परवडेल तसा मांसाहार, भाजीपाला कमी करू नका. पैसे कमी झाले आहेत म्हणून निकृष्ट / स्वस्तातील अन्न खाणे आत्मघातकी सिद्ध होते; रोग प्रतिकारकशक्ती कमी होते, मानसिक तणाव टाळता येत नाहीत, आजारी पडू शकतात. आरोग्यदायी शरीर हा तुमच्या हातातील एकमेव ऍसेट आहे, त्याची काळजी घ्या

३. आपले उत्पन्न कमी झाले आहे तर चला आपल्या बचतीवर व्याज मिळवूया हा विचार मनात येणारच. पण त्या विचाराने अवाजवी व्याजदर देणाऱ्या योजनेत / कंपनीत / बँकेत / पतपेढीत तुमच्या ठेवी ठेवण्याचा मोह झाला तर तो निग्रहाने टाळा ; , दर महिन्याला पाच टक्के, सहा महिन्यात दुप्पट अशा कोणत्याही वाटेल जाऊ नका. जास्त व्याज देणारी म्हणजे जास्त जोखीमवाली गुंतवणूक. व्याज कमी मिळाले तरी चालेल; मुद्दल सुरक्षित राहणे सर्वात महत्वाचे ; जेथे तुम्ही आधीच बचती ठेवल्या आहेत तेथे गडबड होऊ शकते असे वाटले तर ठेवी काढून घ्या.

४. स्टॉक मार्केटने गेल्या काही महिन्यात चांगला परतवा दिला आहे. तुम्हाला देखील चार पैसे मिळाले असतील. पण शेयरबाजार असा सरळ रेषेत आकाशापर्यंत जात नसतो. जागतिकीकरणामुळे भारताच्या बाहेर घडणाऱ्या आर्थिक / बिगर आर्थिक घटना आपला शेयरबाजार कोसळवू शकतात.

५. पैसे कमी आहेत म्हणून साहजिकच कर्ज काढावे लागेल कदाचित. होईल तोपर्यंत कर्ज काढणे टाळा ; घ्यावे लागले तर अल्पमुदतीचे न घेता जेव्हढे दीर्घकालीन मिळेल ते बघा. आव्वा सव्वा व्याजदर आकारणाऱ्या खाजगी सावकाराकडे काही करून जाऊ नका ; गृहकर्ज काढले असेल तर त्यावर “टॉप अप” कर्ज मिळते का पहा.

६. मान्य. मुलांचे वर्ष बुडू नये म्हणून पैसे उभे करावे लागतील. कुटुंबातील कोणी गंभीर आजारी पडला तर इस्पितळात न्यावा लागेल. आणि अशा आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घ्यावेच लागणार. अशा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत लागणाऱ्या कर्ज काढण्यासाठी जागा ठेवा.

७ मंगळसूत्र, ज्यात भावनिक गुंतवणूक आहे असे दागिने सोडून सोन्याचा एखादा छोटा / मोठा दागिना वेळ पडली तर मोडा. चांगला भाव मिळेल हे पहा. चार ठिकाणी चौकशी करून ठरवा, दिवस बदलल्यावर तो दागिना भविष्यात देखील करता येईल. दागिने आपल्यासाठी आहेत आपण दागिन्यांसाठी नाही.

८. थोडे विरोधाभासी वाटेल. पण जमतील तशा छोट्या छोट्या बचती करा. स्त्रियांना हे कौशल्य पिढ्यानपिढ्या माहित आहे. ज्यावेळी कर्जासाठी कोणी दारात उभे करत नव्हते त्या अनेक दशकांच्या काळात स्त्रिया पैसे लपवून लपवून बचती करून अडीनडीला काहीबाही सोय करतच होत्या की. ते शहाणपण माळ्यावरून खाली काढा. तुमच्या हक्काचे थोडे का होईना पैसे हातात असणे महत्वाचे असेल या काळात

९. हे पुरुष भावांसाठी! दारू सारख्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका ; आत्महत्येचे विचार घोंघावत असतील तर त्यांना पिटाळून लावा. एकटे एकटे राहू नका. जास्तीत जास्त वेळ आपल्या बायको, मुले, कुटुंबात, मित्र, आप्तेष्ट यांच्यामध्ये राहा. काही गोष्टी भविष्यावर सोपवा. तुमची तुमच्या कुटुंबाची होत असलेली परवड सिस्टीममुळे आहे. त्याचा अपराध गंड बाळगू नका. स्वतःचे, कुटुंबाचे शारीरिक, मानसिक आरोग्याला कमीतकमी आच लागेल हे बघा.


       
Tags: Debt ManagementEconomic CrisisEconomic Survival TipsFamily BudgetingFinancial ManagementIinvestment
Previous Post

नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Next Post

सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post
सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home