Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन

mosami kewat by mosami kewat
June 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन
       
नांदेड : नांदेड येथे 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या संमेलनाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

संमेलनात ज्येष्ठ समाजाभिमुख कलावंत नामदेव व्हटकर यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या ऐतिहासिक क्षणांचे चित्रीकरण करून इतिहास जतन करण्यासाठी नामदेव व्हटकर यांनी स्वतःचे घर विकून योगदान दिले होते. त्यांच्या या ऐतिहासिक आणि समाजाभिमुख कार्याचा वारसा जपणारे त्यांचे सुपुत्र डॉ. जयवंत नामदेव व्हटकर यांचा प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना आंबेडकरवादी विचार, सामाजिक परिवर्तनामध्ये साहित्याचे योगदान आणि नव्या पिढीने वैचारिक चळवळीशी जोडले जाण्याची गरज यावर भाष्य केले. या संमेलनात मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. नांदी येथे झालेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Tags: Dr Babasaheb AmbedkarMaharashtranandedNanded Hosts 21st Ambedkarite Literary ConferencePolitical
Previous Post

सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

Next Post

बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी!

Next Post
बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी !

बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर
बातमी

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

by mosami kewat
October 18, 2026
0

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील मध्यवर्ती भागातील अतिशय प्रसिद्ध आणि गर्दीच्या चोरबागान सार्वजनिक दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी एका...

Read moreDetails
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home