Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाईच्या निषेधार्थ पैठणमध्ये तीव्र निदर्शने

mosami kewat by mosami kewat
June 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाईच्या निषेधार्थ पैठणमध्ये तीव्र निदर्शने
       

पैठण : कल्याण येथील बुद्धभूमी फाउंडेशनवर ३० मे २०२६ रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईदरम्यान भगवान बुद्धांच्या मूर्ती व बौद्ध स्तूपाची तोडफोड केल्याने पैठण शहरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने बसस्थानक चौकात सरकारविरोधी घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला.

यानंतर आंदोलनकर्त्यांनी पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार  कांबळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –

1. ३० मे रोजी झालेल्या कारवाईदरम्यान घडलेल्या कथित बेकायदेशीर कृत्याची एसआयटीमार्फत चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

2. संबंधित ठिकाणी विपश्यना केंद्र, शैक्षणिक संकुल तसेच समाजोपयोगी रुग्णालय उभारण्यात यावे.

3. बुद्धभूमी फाउंडेशनच्या मागणीनुसार संरक्षण भिंत व पोहोच रस्ता (Approach Road) तातडीने बांधण्यात यावा.

या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक भारत आठवले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश बोरुडे, तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, उपाध्यक्ष शाहीर सुरेश सदावर्ते, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष राम मिसाळ, सुनील अडसूळ, भीमराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किरण घाटविसावे, शहर महासचिव दत्ता पा. वाहुळे, ज्ञानदेव आडसूळ, दीपक गायकवाड, दिलीप ससाणे, सुरेश केसापुरे, सुरेश बळीद, लहू शेळके, खंडागळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक  उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत न्याय्य चौकशी व विकासकामांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे केली.


       
Tags: BuddhistMass Protest in PaithanPolitical
Previous Post

मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून इंदिरा नगर परिसर उजळला; वंचित बहुजन आघाडीचा पाठपुराव्याला यश

Next Post

आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या ‘AN-32’ विमानाला भीषण अपघात; लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

Next Post
आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या 'AN-32' विमानाला भीषण अपघात; लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या 'AN-32' विमानाला भीषण अपघात; लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी
बातमी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

by mosami kewat
August 12, 2026
0

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी...

Read moreDetails
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

August 12, 2026
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

August 12, 2026
घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

August 12, 2026
युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

August 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home