Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

mosami kewat by mosami kewat
June 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

शिरड शहापूर : वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. आंदोलनाची दखल घेत HP गॅस एजन्सी, हिंगोली यांनी शिरड शहापूर येथील ग्राहकांना नियमित सेवा देण्याचा निर्णय घेतला असून, आता दर बुधवारी गॅस गाडी गावात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मागील अनेक महिन्यांपासून शिरड शहापूर व परिसरात HP गॅसचा पुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते.

Also Read : उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

या आंदोलनाला गावकरी, महिला, युवक तसेच HP गॅस ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत HP गॅस एजन्सीशी चर्चा केली. त्यानंतर आज शिरड शहापूर येथे ग्राहकांना गॅस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच यापुढे प्रत्येक बुधवारी नियमितपणे गॅस गाडी पाठविण्यात येईल, असे आश्वासन एजन्सीकडून देण्यात आले.

या निर्णयामुळे परिसरातील ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वंचित बहुजन आघाडी तसेच अनिल कांबळे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Tags: HP Gas DistributionLPG CrisisShahapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

Next Post

शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

Next Post
शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती
बातमी

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

by mosami kewat
July 28, 2026
0

औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय स्वतः नियमावली (गाईडलाईन्स) तयार...

Read moreDetails
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

July 28, 2026
औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

July 28, 2026
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

July 28, 2026
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home