यवतमाळ : तालुका उमरखेड येथील विडूळ गावातील सामान्य कुटुंबातील युवक विश्वजीत बालाजी धुळे याची भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांच्या हस्ते तसेच तालुका उपाध्यक्ष विश्वास धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वजीत धुळे यांच्या घरी जाऊन शाल, पुष्पहार आणि पेढे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
Also Read : ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे.
विश्वजीत धुळे यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थितीतील असून, त्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर भारतीय सैन्यात स्थान मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांनी विश्वजीत तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करत भरभरून कौतुक केले. या सोहळ्याला अशोकराव धुळे, बाबुराव धुळे, दिलीप मुनेश्वर, पंजाब धुळे तसेच विश्वजीत धुळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. भारतीय सैन्यात निवड झाल्यामुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण असून, विश्वजीत धुळे यांच्या यशामुळे इतर युवकांनाही प्रेरणा मिळत आहे.
स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा
मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही...
Read moreDetails






