Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

mosami kewat by mosami kewat
June 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

       

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी धडक कारवाई करण्यात आली. भेसळयुक्त पनीर, खवा, तूप आणि चीजसदृश पदार्थांच्या संशयावरून तब्बल ४७ लाख ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून राज्यभरातील कारवाईत १९२ जणांना अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पुण्यातील सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरातील १७ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या धाडीत ३५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. जप्त केलेल्या साठ्यात २,८०६ किलो पनीर, १३,१२७ किलो खवा, १३८ किलो चीज अॅनालॉग आणि ९६० किलो तूप यांचा समावेश असून सर्व नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. (FDA Raid)

Also Read : स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्या; वंचित बहुजन आघाडीचा दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर भव्य रोजगार हक्क मोर्चा

याशिवाय सातारा जिल्ह्यातील माण, जावळी आणि कराड तालुक्यांमध्येही तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ लाख ३८ हजार रुपयांचा संशयित साठा जप्त दरम्यान, १ ते ५ जून या कालावधीत राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम घातक पदार्थांविरोधात १९५ छापे टाकण्यात आले. या मोहिमेत १ कोटी ९९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. (FDA Raid)

Also Read : ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

धाराशिव, समृद्धी महामार्ग आणि धुळे येथील कारवाईतही कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तर पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांवर अन्न सुरक्षा मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भेसळखोरांविरोधातील ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


       
Tags: FDA MaharashtraFood AdulterationFood Safety EnforcementMaharashtraPublic HealthpuneTukaram Mundhe
Previous Post

स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्या; वंचित बहुजन आघाडीचा दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर भव्य रोजगार हक्क मोर्चा

Next Post

उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

Next Post
उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा
बातमी

स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा

by mosami kewat
August 10, 2026
0

मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही...

Read moreDetails
मांडेगाव येथे 'जय भीम बुद्ध विहारा'चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

मांडेगाव येथे ‘जय भीम बुद्ध विहारा’चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

August 10, 2026
ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

August 10, 2026
ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

August 10, 2026
मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

August 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home