Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार

mosami kewat by mosami kewat
June 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार
       
हिंगोली : वंचित बहुजन आघाडीच्या वसमत तालुका नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. माजी तालुका अध्यक्ष उत्तम करवंदे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वसमत येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक रमेश भुजबळ यांनी प्रास्ताविक करत पक्षाची भूमिका आणि आगामी संघटनात्मक वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच युवा नेते रुपेश भैय्या कदम यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती होती.

यावेळी तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मीकांत स्वामी (तालुका अध्यक्ष), शिलरत्न खंदारे (महासचिव), प्रविण बारहाते, अभिजित आर्वीकर, ग्यानोजी खरवडे व पठाण इरशाद खान (उपाध्यक्ष), भिमराव सरोदे (संघटक), राजरत्न गायकवाड (प्रसिद्धी प्रमुख) तसेच बाळासाहेब कांबळे, पंकज कसबे, सिद्धार्थ मोरे आणि शेख रफिक शेख सुलेमान (सचिव) यांचा समावेश आहे.

कार्यक्रमादरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. महासचिव शिलरत्न खंदारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण पायाला भिंगरी बांधून, ऊन-पाण्याची पर्वा न करता प्रत्येक गाव, तांडा आणि वाड्यावर पक्षाची ‘गाव तिथे शाखा’ उभी करू. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी नूतन कार्यकारिणी अहोरात्र परिश्रम घेईल.”

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तालुक्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी संघटनात्मक विस्तारावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सामाजिक परिवर्तन आणि बहुजन हिताच्या कार्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

Tags: HingoliMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

Next Post

धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home