Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

mosami kewat by mosami kewat
June 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 'VBA सन्मान पुरस्कार २०२६' प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 'VBA सन्मान पुरस्कार २०२६' प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

मुंबई : वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश यांच्या वतीने दादर येथील यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक, तंत्रज्ञान, कला, सांस्कृतिक आणि फोटोग्राफी अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘VBA सन्मान पुरस्कार – २०२६’ प्रदान करून गौरवण्यात आले.

या विशेष कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर सोपवलेली चळवळ आपण सर्वांनी पुढे नेत आहोत. बाबासाहेबांनी जो गाडा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली, तो गाडा पूर्ण ताकदीने पुढे ओढण्याचे काम आपल्याला एकत्रितपणे करायचे आहे. (Vanchit Bahujan Aghadi Awards)

आपण केवळ राजकीय क्षेत्रातच नाही, तर प्रत्येक क्षेत्रात यश कमावले आहे, असे नमूद करत सुजात आंबेडकर पुढे म्हणाले की, ज्या-ज्या क्षेत्रांमध्ये आपल्याला आजपर्यंत जाण्याची संधी किंवा परवानगी नाकारली गेली, त्या सर्व क्षेत्रांमध्ये आज जाऊन स्वतःचे नाव मोठे करणे, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणे आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, हेदेखील आंबेडकरी विचारांचेच कार्य आहे.

आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आंबेडकरवादी विचार पुढे नेणे, ही आजच्या काळातील एक मोठी लढाई आणि संघर्ष आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (Jalasa Vanchit Bahujan 2026)

या सोहळ्यात खालील मान्यवरांना ‘VBA सन्मान पुरस्कार – २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले:

१. मिलिंद धुमाळे (संपादक, जागल्या भारत, मुंबई) – पत्रकारिता क्षेत्र

२. उमाताई जाधव (सामाजिक कार्य, जामखेड, अहमदनगर) – सामाजिक क्षेत्र

३. जोया लोबो (फोटोग्राफर, मुंबई) – फोटोग्राफी क्षेत्र

४. राजू केंद्रे (शैक्षणिक क्षेत्र, नागपूर) – शैक्षणिक क्षेत्र

५. दंगलकार नितीन चंदनशिवे (कवी, साहित्य, सांगली) – साहित्य व कला क्षेत्र

६. गौरव सोमवंशी (तंत्रज्ञान, उद्योजकता, औरंगाबाद) – तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्र

७. गौरव मोरे (अभिनेता, मुंबई) – कला व चित्रपट क्षेत्र

८. प्रकाश भोईर (सामाजिक कार्यकर्ते, मुंबई) – सामाजिक क्षेत्र

९. साजन बेंद्रे (गायक) – कला व संगीत क्षेत्र

१०. सरिता कदम (पॉवर लिफ्टर खेळाडू) – क्रीडा क्षेत्र

११. सुमेध जाधव (पँथर, विविध दलित चळवळीत सक्रिय, वंचित बहुजन आघाडीचे खंदे समर्थक) – सामाजिक व राजकीय क्षेत्र

Tags: AwardsAwards CeremonyJalasaMaharashtraMumbai newsSujat AmbedkarVanchit Bahujan 2026Vanchit Bahujan AghadiVBA Mumbai EventVBA Samman Puraskar 2026
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर फायर स्टेशन परिसर प्रकाशमय; नवीन स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांमध्ये आनंद

Next Post

वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home