Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
May 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन
       
ठाणे : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 29 मे 2026 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले.

देशातील NEET-UG 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर तसेच पालकांच्या आर्थिक व मानसिक संघर्षावर पाणी फेरले गेल्याचा  आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढावे, Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी, राधाकृष्णन समितीच्या शिफारशी तात्काळ लागू करून NEET परीक्षेची जबाबदारी NTA कडून काढून UPSC कडे द्यावी, देशभरातील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करावी तसेच शिक्षणातील वाढते व्यापारीकरण थांबवून खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अनिकेत बंडू मोरे, महासचिव राजू खरात, कल्याण-डोंबिवली शहराध्यक्ष कमलेश उभाळे, ठाणे जिल्हा सदस्य सुशांत साबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: EducationMaharashtraNEET-UG 2026
Previous Post

गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next Post

ए आय मधील महागुंतवणूक: कॉर्पोरेट भांडवलशाहीचा आत्मघातकी प्रवास?

Next Post
ए आय मधील महागुंतवणूक: कॉर्पोरेट भांडवलशाहीचा आत्मघातकी प्रवास?

ए आय मधील महागुंतवणूक: कॉर्पोरेट भांडवलशाहीचा आत्मघातकी प्रवास?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद
बातमी

सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

by mosami kewat
July 26, 2026
0

- संजीव चांदोरकर  दिल्लीत पाच दिवसांपूर्वी सुरू झालेले जंतर-मंतर वरील विद्यार्थी तरुणांचे आंदोलन पुराचे पाणी पसरते तसे देशभर पसरत चालले...

Read moreDetails
अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

July 26, 2026
जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

July 25, 2026
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

July 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home