Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
May 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे  जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
       

जालना : जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथे कथित गावगुंडांविरोधात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवार, दि. 29 मे 2026 रोजी जालना येथील पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या निवेदनात गाढे गव्हाण येथील काही जातीयवादी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच संबंधित व्यक्तींना राजकीय पाठबळ मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

या संदर्भात टेंभुर्णी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती तसेच भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) यांच्याकडे मागील अनेक महिन्यांपासून वारंवार लेखी तक्रारी देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांना निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच आंबेडकरी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप असलेल्या पीएसआय बाबासाहेब खार्डे यांच्या भूमिकेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सूरज सोनवणे, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, विजय सावंत, सुनिता सावंत, विलास सावंत, लंका सावंत, बबन सावंत, ज्ञानेश्वर हिवाळे, छाया हिवाळे, राजू सावंत, विद्या सावंत, राहुल सावंत, संगीता सावंत, सदाशिव सावंत, शीला सावंत, भगवान घोरपडे, सुभद्रा घोरपडे, विष्णू सावंत, राजू दाभाडे, विजय दाभाडे, गंभीर सावंत, अनिल हिवाळे, नितीन हिवाळे, राधिका हिवाळे, भगवान दाभाडे, रमेश हिवाळे, योगेश हिवाळे, वंदना सावंत, मंदा हिवाळे, लताबाई सावंत, आनंद हिवाळे, समाधान हिवाळे, प्रल्हाद हिवाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान संबंधित प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, न्याय न मिळाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.


       
Tags: jalnaJusticeMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

सगरोळीत २३ लाखांच्या सीसी रोड कामाला सुरुवात; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

Next Post
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home