Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य ‘बैलगाडी मोर्चा’; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

mosami kewat by mosami kewat
May 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य 'बैलगाडी मोर्चा'; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य 'बैलगाडी मोर्चा'; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

       

Bullock Cart March in Akola : केंद्र सरकारच्या नाकर्तेपना  आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गोरगरीब सामान्य जनतेला आज इंधन, अन्नधान्य, तेल जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे अशक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जनतेला पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल, खते बचतीचे आणि वर्क फ्रॉम होम, सोने चांदी खरेदी न करण्याचे आवाहन करतात, मात्र स्वतः ते आणि भाजपवाले शेकडो गाड्यांचा ताफा, मोठ्या रॅली आणि कार्यक्रम घेत उधळपट्टी करत आहेत.

Also Read : गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

जनतेसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा नियम, या दुटप्पी भूमिकेचा आणि वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २५ मे २०२६ रोजी अकोला येथे पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ९ वाजता भव्य ‘बैलगाडी मोर्चा’ काढणार आहे.

या ऐतिहासिक मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आणि तालुकास्तरीय नियोजनासाठी अकोला जिल्ह्यातील सात तालुके आणि महानगरमध्ये विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या, अरुंधती सिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा समन्वयक प्रदेश युवक आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे, अकोला जिल्हा समन्वयक खतीब साहेब, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका पार पडणार आहेत.

तालुकानिहाय बैठकांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

२१ मे २०२६ : तेल्हारा (सकाळी ११:०० वा.)  शासकीय विश्रामगृह तेल्हारा | अकोट (दुपारी १:३० वा.) शासकीय विश्रामगृह अकोट

२२ मे २०२६: मूर्तीजापूर (सकाळी ११:०० वा.) शासकीय विश्रामगृह मूर्तिजापूर  | बार्शी टाकळी (दुपारी १:३० वा.) मानकर कॉम्प्लेक्स मंगरूळपीर रोड बार्शीटाकळी

२३ मे २०२६: बाळापूर (सकाळी ११:०० वा.) पंचायत समिती सभागृह बाळापुर | पातूर (दुपारी १:३० वा.) शासकीय विश्रामगृह पातुर

२४ मे २०२६: अकोला तालुका आणि महानगर (अकोला येथे दुपारी १२:३० वा) अशोक वाटिका अकोला

बैठकीला प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, युवक अध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, महिला आघाडी अध्यक्षा आम्रपाली खंडारे, महासचिव संगीता अढाऊ, भारतीय बौद्ध महासभा (भा बौ म) महासचिव नंदकुमार डोंगरे, सम्यक अध्यक्ष धीरज इंगळे आणि विद्वत सभा अध्यक्ष सिद्धार्थ देवधरीकर प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

Also Read :  Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी



सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महागाईने होरपळणाऱ्या सामान्य जनतेने या बैठकांना आणि २५ मे रोजी होणाऱ्या बैलगाडी मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.


       
Tags: Against Price RiseAkola Bullock Cart MarchAkola ProtestBullock Cart March in AkolaBullock Cart ProtestFuel Price HikeGas Cylinder Price HikeInflation CrisisPetrol Diesel Price HikeVanchit Bahujan Aghadi
Previous Post

गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Next Post

भारतीय अर्थव्यवस्था (१): इक हवा का झोका आया, टूटा डालीसे फुल !

Next Post
भारतीय अर्थव्यवस्था (१): इक हवा का झोका आया, टूटा डालीसे फुल !

भारतीय अर्थव्यवस्था (१): इक हवा का झोका आया, टूटा डालीसे फुल !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !
बातमी

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

by mosami kewat
September 21, 2026
0

- संजीव चांदोरकर वित्त भांडवलाच्या युगात, स्थापनेनंतर फक्त २५ वर्षाच्या कालावधीत पूर्ण देशभर फूटप्रिंट असणारा भागभांडवलाचा पंथ (  इक्विटी कल्ट) ...

Read moreDetails
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home