Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यात आरएसएस – भाजपचा वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा कट ;वंचित बहुजन आघाडीने केला पर्दाफाश

Akash Shelar by Akash Shelar
May 3, 2026
in बातमी
0
अकोल्यात आरएसएस – भाजपचा वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा कट ;वंचित बहुजन आघाडीने केला पर्दाफाश
       
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचे बॅनर्स शहरातील काही भागात लागले आहेत. हे अनेकांनी पाहिले आहे. वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत हा भाजपा – आरएसएस यांनी विचारपूर्वक कट असल्याचे म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांना संबोधित करत म्हटले की,अकोला शहरात काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचे बॅनर्स लागले आहेत. हे अनेकांनी पाहिले असेल. हा भाजपा-आरएसएसने एक विचारपूर्वक रचलेला कट आहे. अत्यंत जातीयवादी, द्वेषपूर्ण व्यक्ती टी. राजाच्या स्वागताचे लावलेले बॅनर्स हे वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांच्या सहमती शिवाय लावले गेले आहेत. ज्यामुळे त्यांची बदनामी केली जाऊ शकेल तसेच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जावा.

वंचित बहुजन आघाडी टी राजा सारख्या , द्वेषपूर्ण, जातीयवादी व्यक्ती, ज्यावर सोशल मीडियाने देखील प्रतिबंध केला आहे. टी राजा अत्यंत विखारी, विकृत अशी व्यक्ती आहे, याचे समर्थन आम्ही कधी करू शकत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे वंचितने म्हटले.

वंचित बहुजन आघाडी सातत्याने आरएसएस-भाजपाविरोधात लढा देत आहे. औरंगाबाद येथे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आरएसएस कार्यलयावर मोर्चा वंचित बहुजन आघाडीने काढला होता. नागपूर येथे आरएसएसच्या मुख्य कार्यलयावर देखील आम्ही मोर्चा काढला होता. त्यामुळे आरएसएसच्या विरोधातील लढाई आम्हीच लढतोय.असेही वंचित बहुजन आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निलेश देव, सुनील इल्लानी या आमच्या नेत्यांनी आयोजकांना जाब विचारला त्यावर आयोजकांनी मान्य केले की, त्यांनी परस्पर फोटो टाकलेत. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवक निलेश देव, सुनील इल्लानी हे सर्व बॅनर्स फाडले आहेत. याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही वंचितने सांगितले.

Tags: AkolabjprssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Next Post

अकोल्यात टी. राजा सिंगच्या सभेला परवानगी ; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post
अकोल्यात टी. राजा सिंगच्या सभेला परवानगी ; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोल्यात टी. राजा सिंगच्या सभेला परवानगी ; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home