Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यात टी. राजा सिंगच्या सभेला परवानगी ; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
May 3, 2026
in बातमी
0
अकोल्यात टी. राजा सिंगच्या सभेला परवानगी ; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       
अकोला : अकोल्यात आज श्री एकवीरा मैदान, माढवनगर गोरक्षण रोड येथे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेला टी. राजा सिंग यांना परवानगी दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या अकोला जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत विरोध नोंदवला आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक, अकोला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टी. राजा सिंग हे धार्मिक तेढ निर्माण करणारे जातीवादी व्यक्तिमत्व असून त्यांच्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे विविध समुदायांमध्ये वैमनस्य वाढण्याची शक्यता असते. त्यांच्या विरोधात ‘द्वेषपूर्ण भाषण आणि वैमनस्य वाढवणे’ यांसारख्या आरोपांखाली अनेक एफआयआर दाखल आहेत.

तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांच्यावर ‘तेलंगणा धोकादायक कृत्ये प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत कारवाईही करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा पार्श्वभूमीवर, अकोल्यात त्यांच्या सभेला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.

तसेच या कार्यक्रमामुळे शहरात कोणताही जातीय तणाव, संघर्ष किंवा हिंसाचार उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या सभेचा आणि प्रशासनाच्या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीच्या अकोला शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे.

Tags: Akolabjprsst rajaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोल्यात आरएसएस – भाजपचा वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा कट ;वंचित बहुजन आघाडीने केला पर्दाफाश

Next Post

भारतीय बँकिंग/ वित्त क्षेत्रातील वाढते परकीय भांडवल! 

Next Post
भारतीय बँकिंग/ वित्त क्षेत्रातील वाढते परकीय भांडवल! 

भारतीय बँकिंग/ वित्त क्षेत्रातील वाढते परकीय भांडवल! 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home