Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

भारतीय बँकिंग/ वित्त क्षेत्रातील वाढते परकीय भांडवल! 

mosami kewat by mosami kewat
May 3, 2026
in article, अर्थ विषयक
0
भारतीय बँकिंग/ वित्त क्षेत्रातील वाढते परकीय भांडवल! 
       

– संजीव चांदोरकर  

जे कोणी राष्ट्रहित, देशातील पुढच्या पिढ्यांचे भवितव्य, वेगाने बदलणाऱ्या भू राजनैतिक संदर्भात देशाच्या महत्वाच्या क्षेत्रांची मालकी नक्की कोणाकडे असावी….या व अशा प्रश्नांकडे गांभीर्याने बघू शकतात त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. 

इराण युद्ध केंद्री बातम्यानी सारा अवकाश भरून गेला आहे. साहजिकच आहे ते. पण भारतीय अर्थव्यवस्थेत जे धीम्या गतीने पण निर्णायक अनेक संरचनात्मक बदल होत आहेत त्याची किमान माहिती तरी ठेवली पाहिजे. अँकॅडमीक नाही. त्याचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत म्हणून. 

त्यातील एक महत्वाचा बदल आहे भारतीय बँकिंग आणि वित्त क्षेत्रात वेगाने वाढत असलेली परकीय मालकी..

परकीय कंपन्यांनी / गुंतवणूकदारांनी भारतीय बँका / कंपन्या मध्ये गुंतवणूक करण्याच्या बातम्या आपण अधून मधून वाचत असतो. पण त्या बातम्या एकत्रित जोडून बघितल्या की त्याचे वजन कळते. 

अलीकडच्या काळात भारतीय बँकिंग वित्त क्षेत्रात परकीय गुंतवणूकी खालील प्रमाणे 

सुमोटोमो बँकिंग कॉर्पोरेशनने, जी जपान मधील दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे, भारताच्या येस बँकेत १६०० मिलियन डॉलर्स गुंतवणूक करून २५ टक्के मालकी खरेदी केली. 

अबुधाबी इंटरनॅशनल कंपनीने १००० मिलियन डॉलर्स मध्ये सन्मान कॅपिटल (पूर्वीची इंडिया बुल्स हाउसिंग) मध्ये कंट्रोलिंग इंटरेस्ट खरेदी केले 

Warburg Pincus अमेरिकेतील एक मोठा प्रायव्हेट इक्विटी फंड. IDFC First बँकेत ४,८७६ कोटी रुपये मोजून १० टक्के मालकी घेतली 

एमिरेट्सच्या NDB ने RBL बँकेत ३००० मिलियन डॉलर्स देऊन ६० टक्के मालकी घेतली 

Blackstone ने फेडरल बँकेत १० टक्के शेअर्स घेण्याचे जाहीर केले 

MUFG जपान ने ४,४०० मिलियन डॉलर्स देऊन Shriram Finance मध्ये २० टक्के मालकी घेतली 

Bain capital अमेरिका ने Manappuram Finance मध्ये ४२ टक्के मालकी घेतली 

वरील एकूण परकीय गुंतवणुकी ११,००० मिलियन डॉलर्स वर जातात. या यादीत तीन वर्षापूर्वी भारतीय बँकिंग वित्त क्षेत्रात आलेल्या परकीय गुंतवणूकी धरलेल्या नाहीत. उदा. लक्ष्मी विलास डीबीएस सिंगापूरने घेणे. 

भारताच्या बँकिंग / वित्त क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीना रिझर्व बँकेची परवानगी लागते. स्वातंत्र्यानंतर अगदी अलीकडेपर्यंत भारताने या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला फारसे प्रोत्साहन न देण्याचे धोरण अमलात आणले होते. 

त्यात जानेवारी २०२५ मध्ये रिझर्व बँकेने धोरणात्मक बदल केले आहेत. बँकिंग वित्त क्षेत्रात परकीय गुंतवणूकीचा ओघ अचानक वाढल्याची मुळे त्या बदलात आहेत..

पण मुळात रिझर्व्ह बँकेला असा बदल याचवेळी करावासा का वाटला ? असा प्रश्न विचारणे म्हणजे राजकीय आर्थिक विचार करणे 

१.  तांत्रिकदृष्ट्या रिझर्व्ह बँक स्वायत्त आहे. ती देशाच्या भल्यासाठी धोरणात्मक बदल करते हे शाळकरी वाक्य झाले. भारताचे अमेरिकेसारख्या महासत्तेबरोबर जे करार मदार होतात , त्यात भारताने आपले बँकिंग / वित्त क्षेत्र परकीय / अमेरिकन भांडवलाला खुले केले पाहिजे अशा प्रकारच्या अटी असतात. 

२.  अनेक कारणांमुळे भारतातील बँकिंग क्षेत्राकडे येणारा बचतीचा ओघ पूर्वीसारखा राहिलेला नाही. हे दुसरे कारण 

३,  अनेक कारणांमुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी तणावात राहिली आहे. अलीकडच्या काळात तर जास्तच. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरणे हा त्याचाच एक भाग. देशात परकीय गुंतवणुकींना परवानगी शिथिल केल्यामुळे परकीय चलनाच्या गंगाजळीत भर पडेल हे अजून एक उद्दिष्ट आहे 

४ शेवटचा मुद्दा. जो सर्वात महत्त्वाचा. वरील सर्व गुंतवणुकी अस्तित्वात असणाऱ्या उपक्रमात आल्या आहेत / येणार आहेत. त्या देखील बँकिंग / वित्त क्षेत्रात. देशाला गरज आहे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात ग्रीन फिल्ड प्रकल्पांची. त्यात परकीय भांडवलाला तुलनेने कमी रस आहे 

काही ताबडतोबीचे इश्यू ॲड्रेस करण्यासाठी देशाचे दीर्घकालीन हित नजरेआड होत आहे का ? तुम्हीच विचार करा. 

सौजन्य Hemindra Hazari यांचा RUPE वेब पोर्टल वरील लेख


       
Tags: BankingEconomics
Previous Post

अकोल्यात टी. राजा सिंगच्या सभेला परवानगी ; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

Next Post
महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

by mosami kewat
June 12, 2026
0

मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'विद्यार्थी आक्रोश मोर्चा' दरम्यान मोठा तणाव...

Read moreDetails
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

June 12, 2026
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

June 12, 2026
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

June 12, 2026
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

June 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home