Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयात विविध ठिकाणी सामूहिक वाचन 

mosami kewat by mosami kewat
April 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयात विविध ठिकाणी सामूहिक वाचन 
       

Osmanabad News : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयात शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाचन करण्यात आले. कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा या पुस्तकांमधून त्यांनी मांडली पण इथल्या काही लोकांनी महापुरुषां चे विचार स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले आहे, हे षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कॉ. गोंविद पानसरे लिखित असलेले शिवाजी कोण होता? हे पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करत त्यांना धमकी दिली या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सामूहिक वाचन करून निषेध व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन चौकाचौकामध्ये करा या आव्हानास प्रतिसाद देत जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी सामुहिक वाचन करण्यात आले.

उस्मानाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव नसीर शेख, जिल्हा संघटक विकास बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष रुस्तुम पठाण, युवक जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण, सहप्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमारे, सम्यक विद्यार्थी आंदोलन सचिव अक्षय बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नंदकुमार हावळे, जि. उपाध्यक्ष महादेव येडके, जि. संघटक काश्यप बनसोडे, जेष्ठ नेते रमेश गंगावणे, अजित कसबे, सुभाष सोनावणे, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते.

तसेच कळंब येथे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष, बाबासाहेब कांबळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष एल. आर. धावारे अनिल हजारे, तालुक्याचे महासचिव बि. एम. आव्हाड मेजर विठ्ठल हजारे, तसेच रतन सावंत, लहू हिंगे, दत्ता पाचपिंडे, बाबासाहेब टोपे, गौतम वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

परंडा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी कोण होता? या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे शहराध्यक्ष किरण बनसोडे तालुका महासचिव विलास जाधव ज्येष्ठ साहित्यिक तू. दा. गंगावणे, राहुल बनसोडे, घनश्याम शिंदे, नवनाथ आबा गावडे उपस्थित होते.


       
Tags: MaharashtraOsmanabad NewsPoliticalShivaji kon hotaShivaji Kon Hota Book ReadingVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अहमदनगर पोलीस प्रशासनाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; ११ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन

Next Post

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

Next Post
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र
अर्थ विषयक

रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

by mosami kewat
July 1, 2026
0

- संजीव चांदोरकर  एका बाजूला मागणी नसल्यामुळे विक्री विना पडून असलेली महागडी घरे आणि  दुसऱ्या बाजूला किमती परवडत नसल्याने चांगल्या...

Read moreDetails
Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

Aurangabad : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवली

July 1, 2026
मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 1, 2026
वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

June 30, 2026
तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

June 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home