Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध

mosami kewat by mosami kewat
April 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध
       
Jamkhed News : वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्ष, जामखेड (जिल्हा अहिल्यानगर) यांच्या वतीने आज (दि. २७ एप्रिल) तहसील कार्यालयासमोर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. हा उपक्रम वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव आणि नगरसेविका संगीता ताई भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड तसेच बागेश्वर महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करण्यात आला.

उपस्थितांनी घोषणाबाजी करत संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली. कार्यक्रमात ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. 

शिवाजी महाराजांचे लोकाभिमुख राज्यकारभार, रयतेप्रती कणव, शेतकरी व सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, व्यापार-उद्योग संरक्षण, गुलाम व्यापारास बंदी, धार्मिक सहिष्णुता, मुस्लीम सरदारांचा सहभाग, स्त्रियांच्या सन्मानाचे धोरण, तसेच इतिहासातील विविध संदर्भांवर त्यांनी मुद्देसूद विवेचन केले.

यावेळी बोलताना त्यांनी आमदार संजय गायकवाड यांनी राजीनामा द्यावा तसेच बागेश्वर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. “शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अपशब्द काढले तर आम्ही गप्प बसणार नाही. अठरापगड, अलुतेदार-बलुतेदार, भटके, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम यांचे राजे म्हणून शिवाजी महाराज सर्वसमावेशक आहेत,” असे ते म्हणाले.

या सामूहिक वाचनात बापू ओहोळ, शहाजी डोके, रजनी बागवान, संगीता भालेराव आणि उर्मिला कवडे यांनी सहभाग घेत पुस्तकाचे वाचन केले. कार्यक्रमास सुमित भालेराव, विशाल पवार, अंकल घायतडक, अनिल सदाफुले, विकी कांबळे, सुशील राजगुरू, पप्पू भालेराव, अशोक आव्हाड, ऋषिकेश गायकवाड, रामेश्वर काळे, अश्विनी काळे, संतोष चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमातून इतिहासाच्या चिकित्सक वाचनासोबतच आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

Tags: Books readingjamkhedMaharashtraPoliticalShivaji kon hota bookVanchit Bahujan Aghadi
Previous Post

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध; मूर्तिजापुरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

Next Post

नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

Next Post
नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी
बातमी

नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

by mosami kewat
April 27, 2026
0

Medical College Accident : नाशिक येथील मेडिकल कॉलेजमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लिफ्ट कोसळल्यामुळे एका महिला कर्मचाऱ्याचा...

Read moreDetails
नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

April 27, 2026
जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध

April 27, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध; मूर्तिजापुरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध; मूर्तिजापुरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

April 27, 2026
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती उत्साहात साजरी; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती उत्साहात साजरी; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

April 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home