Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या! सचिन जोरे; बहुजन हिताय संघातर्फे नांदेड सिटीत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर

mosami kewat by mosami kewat
April 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या! सचिन जोरे; बहुजन हिताय संघातर्फे नांदेड सिटीत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर
       
नांदेड सिटी, पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाच्या बळावर स्वतःचा आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचा मार्ग बदलला. याची जाणीव ठेवून त्यांच्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या, असे असे प्रतिपादन माजी न्यायाधीश सचिन जोरे यांनी केले.

बाबासाहेबांनी देशाला बहाल केलेल्या न्याय, स्वातंत्र्य आणि समतेच्या घटनात्मक मूल्यांची जपणूक करणे हीच काळाची गरज आहे. केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन जोरे यांनी केले. नांदेड सिटीत बहुजन हिताय संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी व्याख्यानात जोरे बोलत होते. 

या तीन दिवसांच्या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर गीते आणि इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. बहुजन हिताय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याचे यशस्वी नियोजन केले.

रॅलीत अवतरले महात्मा फुले अन् सावित्रीमाई!

सर्व समाज घटकांना एकत्र आणून समतेचा, बंधुभावाचा संदेश देत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये नांदेड सिटी व परिसरातील आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॉलीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत रघूनाथ ढोक व राखी रासकर हे सहभागी झाले होते.

Tags: ConstitutionDr B R AmbedkarDr Babasaheb Ambedkar jayantiMaharashtraNanded city pune
Previous Post

सब चंगा नही है जी ! बँकांची भरभराट, गरिबांची घरघर; गोल्ड लोनच्या विळख्यात सामान्य जनता

Next Post

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

Next Post
आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा
article

भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा

by mosami kewat
April 22, 2026
0

- संजीव चांदोरकर ट्रम्प यांना शिव्या न देता, मुळात लोकशाही असताना ट्रम्प त्याजागी पोचलेच कसे ? हे भारतासारख्या इतर देशात...

Read moreDetails
प्रशासनात खळबळ: नवी मुंबई महापालिका मुख्यालयातच एसीबीचा सापळा; अधिकाऱ्याला 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

प्रशासनात खळबळ: नवी मुंबई महापालिका मुख्यालयातच एसीबीचा सापळा; अधिकाऱ्याला 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

April 22, 2026
हिंदू राष्ट्राची वल्गना करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीची आणि माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची भेट !

हिंदू राष्ट्राची वल्गना करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीची आणि माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची भेट !

April 22, 2026
आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

April 22, 2026
बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या! सचिन जोरे; बहुजन हिताय संघातर्फे नांदेड सिटीत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर

बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या! सचिन जोरे; बहुजन हिताय संघातर्फे नांदेड सिटीत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर

April 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home