Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत

mosami kewat by mosami kewat
April 19, 2026
in बातमी
0
काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत
       
Tragic Accident : उत्तराखंड जिल्ह्यात चंपावत येथे घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. वार्षिक क्रीडा स्पर्धेपूर्वी सुरू असलेल्या सरावादरम्यान 20 वर्षीय पॉलिटेक्निक विद्यार्थ्याचा जीव गमवावा लागला. भालाफेकीच्या सरावात असताना चुकून फेकलेला भाला थेट त्याच्या गळ्यात घुसल्याने ही भीषण घटना घडली.

शनिवारी सकाळी गोरिलचौर मैदानावर विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांचा सराव करत होते. याच वेळी सोमेंद्र सिंह बोहरा हा विद्यार्थी फुटबॉल आणण्यासाठी मैदानाच्या दुसऱ्या टोकाकडे गेला. अनवधानाने तो भालाफेकीच्या पट्ट्यात पोहोचला आणि त्याच क्षणी फेकलेला भाला वाऱ्याच्या दिशेमुळे मार्ग बदलत त्याच्या गळ्यात घुसला. (Uttarakhand Tragic Accident)

घटनेनंतर तात्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर जखमांमुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सोमेंद्र हा अग्निवीर भरतीची तयारी करत होता आणि नुकतीच त्याने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याचे वडील गुजरातमध्ये कामगार म्हणून नोकरी करतात, तर तो आई आणि तीन बहिणींसह चंपावत येथे राहत होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही.

Tags: accidentsportsUttarakhandUttarakhand Tragic Accident
Previous Post

दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या

Next Post

कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

Next Post
कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home