राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पक्षाच्या राज्य प्रवक्त्या दिशा शेख यांनी सत्ताधारी व प्रस्थापितांवर जोरदार टीका केली.
“लोकशाहीत निवडणुका गरिबांच्या हातात राहू नयेत म्हणून भांडवलदारांनी त्या सामान्य लोकांकडून काढून घेतल्या आहेत. मर्यादित संसाधनांमध्येही आम्ही प्रस्थापितांना भिडत आहोत,” असे त्या म्हणाल्या.
तसेच २०१४ मध्ये तृतीयपंथीयांना मतदानाचा अधिकार मिळाल्याचा उल्लेख करत, “तुम्हाला मतदानाचा अधिकार जन्मतः मिळालेला असूनही तुम्ही तो विकता,” असा आरोप त्यांनी केला.
हरेगावमधील घटनेचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांना प्रश्न विचारत, “त्या वेळी अत्याचार करणारे कोण होते आणि तुम्हाला वाचवणारे कोण होते, हे आठवा,” असे आवाहन केले. त्याचबरोबर “त्यांचे प्रतिनिधी असलेले संतोष चोळके यांना निवडून द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.
सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.






