Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीचा अभिनव उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
April 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीचा अभिनव उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
       

औरंगाबाद : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीचौक येथे महिला आघाडीचे विशेष स्टेज उभारण्यात आले असून या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर, प्रदेश सदस्य व जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाठ आणि नेते तथा नगरसेवक अमित भुईगळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शहरात इतर कोणत्याही प्रमुख पक्षाकडून महिलांसाठी स्वतंत्र स्टेज उभारण्यात आले नसताना वंचित बहुजन महिला आघाडीने सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवला आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

क्रांतीचौक येथे उभारलेल्या या स्टेजला भेट देण्यासाठी विविध पदाधिकारी आणि नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये नेते अमित भुईगळ, प्रदेश प्रवक्ता तय्यब जफर, नगरसेविका करुणा जाधव, नगरसेवक जावेद कुरेशी, जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, रूपचंद गाडेकर, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, जिल्हा अध्यक्षा (प) कोमल हिवाळे, शहराध्यक्ष मतीन पटेल, युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे आदी मान्यवरांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी महिलांना प्रमाणपत्र देत शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर अध्यक्षा वंदना जाधव (नरवडे), साधना पठारे (प), वर्षा जाधव (उपाध्यक्ष), वैशाली राणेकर (उपाध्यक्ष), धम्मप्रिया खरात (महासचिव), मंगल देहरे (प्रसिद्धी प्रमुख), जया गजभिये (सल्लागार), सुनीता सोनावणे (संघटक), रेखा उजगिरे (सचिव), अॅड. पुष्पा घोडके (कोषाध्यक्ष) तसेच आमपाली दांडगे, मोनिका मोरे, कावेरी गायकवाड, सचिन गायकवाड, अनुश जाधव आणि इतर सर्व महिला आघाडी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिलांना संघटित करण्यासाठी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, शहरात याची सकारात्मक चर्चा सुरू आहे.


       
Tags: aurangabadAurangabad newsDr Babasaheb AmbedkarDr Babasaheb Ambedkar jayantiElectionMaharashtraVanchit Bahujan Aaghadiwomens
Previous Post

‘हा अपघात की घातपात?’: डॉ. जितेंद्र शेळकेच्या मृत्यूवर वंचित बहुजन आघाडीचा संशय!

Next Post

तलवारी म्यानात: ट्रम्प, इराण आणि शांततेची नवी खेळी

Next Post
तलवारी म्यानात: ट्रम्प, इराण आणि शांततेची नवी खेळी

तलवारी म्यानात: ट्रम्प, इराण आणि शांततेची नवी खेळी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार
बातमी

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

by mosami kewat
August 18, 2026
0

२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत...

Read moreDetails
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

August 18, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home