Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

तलवारी म्यानात: ट्रम्प, इराण आणि शांततेची नवी खेळी

mosami kewat by mosami kewat
April 18, 2026
in article, अर्थ विषयक
0
तलवारी म्यानात: ट्रम्प, इराण आणि शांततेची नवी खेळी
       

– संजीव चांदोरकर

“सुमो” कुस्तीगीर सारख्या अवाढव्य प्रतिस्पर्ध्याला , छोट्या चणीच्या, पण अनेक दशके नियमित व्यायाम आणि मातीतील कुस्तीची प्रॅक्टीस करणाऱ्या.. प्रतिस्पर्ध्याने जेरीस आणले. 

इस्लामाबाद वाटाघाटींमध्ये लेबनॉन मध्ये देखील शस्त्रसंधी लागू झाला पाहिजे म्हणून आग्रह धरणाऱ्या इराणला…वाटाघाटींच्या दुसऱ्या फेरीसाठी राजी करण्यासाठी, ट्रम्प यांनी मोकाट सुटलेल्या नेत्यानाहू रक्तपिपासू गुंडाला लेबनॉन वर बॉम्ब टाकण्यास बंदी (prohibited) घातली. 

प्रतिसाद देत इराणने देखील हॉर्मुझ व्यापारी जहाजांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला 

अर्थात आपल्याला फक्त घोषणा झाल्या की बातम्या मिळतात. पडद्याआड अनेक पातळ्यांवर स्क्रिप्ट लिहिले जाते. त्यात बदल केले जातात. कोणी ,काय, केव्हा म्हणायचे हे ठरते. 

इराणने जाहीर केले आहे की हॉर्मुझ फक्त व्यापारी जहाजांसाठी असेल, हा मुक्त मार्गाचा कालावधी शस्त्रसंधी जोपर्यंत असेल तोपर्यंतच असेल, इराणने नेमून दिलेल्या समुद्री मार्गावरून जहाजे येजा करतील आणि जहाजांना इराणची परवानगी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकाराचा टोल भरण्याचा मात्र उल्लेख नाही. 

ट्रम्प यांनी इराणच्या निर्णयाचे स्वागत केले. पण हे देखील सांगितले की इराण बरोबरच्या वाटाघाटीत कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत अमेरिकेचे नौदल हॉर्मुझ मध्ये नाकेबंदी सारखे उभे असेल. 

उघड आहे की मधल्या काळात अमेरिका आणि इराण एकमेकाचा अंदाज घेत राहणार आहेत. 

अमेरिकेने, इस्रायलच्या प्रभावाखाली इराणचा एवढी वर्षे दुस्वास केला आहे, मागच्या वर्षी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आलेल्या असताना अचानक हल्ला केला…त्यामुळे प्रचंड अविश्वास तयार झाला आहे. मधला काळ कॉन्फिडन्स बिल्डिंगचा असणार. 

कसेही असले तरी सर्वांच्या/ जगाच्या दृष्टीने नक्कीच चांगली बातमी आहे. 

दहा दिवस तर दहा दिवस, अजून वाढवा शस्त्रसंधी, दुसरी, तिसरी, चौथी वाटाघाटींची फेरी होऊदे…पण तलवारी म्यानात राहिल्या पाहिजेत एवढीच इच्छा आहे सर्वांची 


       
Tags: donald trampIran America warIran Israel WarWord war
Previous Post

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीचा अभिनव उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मल्याळम टीव्हीविश्वात शोककळा; अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन

Next Post
मल्याळम टीव्हीविश्वात शोककळा; अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन

मल्याळम टीव्हीविश्वात शोककळा; अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home