Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबादमध्ये वंचित महिला आघाडीचे स्टेज; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
April 17, 2026
in बातमी
0
औरंगाबादमध्ये वंचित महिला आघाडीचे स्टेज; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
       
औरंगाबाद : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर आणि प्रदेश सदस्य तथा जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन महिला आघाडी, शहर शाखेच्या वतीने क्रांती चौक येथे विशेष स्टेज उभारण्यात आले.

या महिला आघाडीच्या स्टेजला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, याआधी भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस यांसारख्या प्रमुख पक्षांकडून महिलांसाठी स्वतंत्र स्टेज उभारण्यात आले नव्हते. त्यामुळे महिला आघाडीचा हा उपक्रम वेगळेपण जपणारा ठरला आहे. महानगराच्या वतीने महिला आघाडीचे स्टेज उभारण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

स्टेजला भेट देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये नगरसेवक अमित भुईगळ, नगरसेविका करुणा जाधव, प्रदेश प्रवक्ते तय्यब जफर, नगरसेवक जावेद कुरेशी, जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, जिल्हाध्यक्षा (प) कोमल हिवाळे, शहराध्यक्ष मतीन पटेल, युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे यांचा समावेश होता.

त्यांनी स्टेजला भेट देऊन महिलांना शुभेच्छा दिल्या तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमाणपत्र प्रदान केले. या उपक्रमाचे आयोजन महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना जाधव (नरवडे) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यामध्ये साधना पठारे (प) शहराध्यक्ष, वर्षा जाधव (उपाध्यक्ष), वैशाली राणेकर (उपाध्यक्ष), धम्मप्रिया खरात (महासचिव), मंगल देहरे (प्रसिद्धी प्रमुख), जया गजभिये (सल्लागार), सुनीता सोनावणे (संघटक), रेखा उजगिरे (सचिव), आमपाली दांडगे, मोनिका मोरे, कावेरी गायकवाड, सचिन गायकवाड, अनुश जाधव यांच्यासह शहरातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे महिलांच्या संघटनात्मक सहभागाला चालना मिळत असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांची भूमिका अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Tags: aurangabadBhim jayantiMaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अनियमिततांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबादमध्ये वंचित महिला आघाडीचे स्टेज; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बातमी

औरंगाबादमध्ये वंचित महिला आघाडीचे स्टेज; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by mosami kewat
April 17, 2026
0

औरंगाबाद : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. राष्ट्रीय...

Read moreDetails
परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अनियमिततांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा!

परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अनियमिततांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा!

April 16, 2026
आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली

आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली

April 16, 2026
चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

April 16, 2026
दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न

दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न

April 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home