Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अनियमिततांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा!

mosami kewat by mosami kewat
April 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अनियमिततांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा!
       
परभणी : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देत वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, परभणी येथे सुरू असलेल्या आर्थिक व प्रशासकीय अनियमिततांबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी पत्राद्वारे हे निवेदन दिले आहे.

विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भात 8 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित झालेल्या वृत्ताचा तसेच शासन निर्णयांचा उल्लेख करून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (MCAER), पुणे यांनी संबंधित अनियमिततांचा अहवाल कृषी मंत्रालयाकडे सादर केला असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांनी शासन निर्णयांचे उल्लंघन करून नियुक्त्या व पदवाटप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

यामध्ये विशेषतः विद्यापीठातील काही पदांवर नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्याचा उल्लेख असून, संबंधित व्यक्ती या सर्व अनियमिततांमध्ये सहभागी असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर महाराष्ट्र सार्वजनिक सेवा नियम व इतर कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास 22 एप्रिल 2026 पासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी, दलित, आदिवासी संघटनांच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनाची प्रत राज्यपाल, मुख्य सचिव, लोकायुक्त तसेच कृषी विभागाला देखील पाठविण्यात आली आहे.

Tags: AgriculturalFarmerMaharashtraparbhaniPolitical
Previous Post

आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली

Next Post

औरंगाबादमध्ये वंचित महिला आघाडीचे स्टेज; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
औरंगाबादमध्ये वंचित महिला आघाडीचे स्टेज; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबादमध्ये वंचित महिला आघाडीचे स्टेज; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक
बातमी

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

by mosami kewat
September 27, 2026
0

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने उद्या, सोमवारी २८...

Read moreDetails
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

September 27, 2026
केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

September 27, 2026
या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

September 27, 2026
दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home