Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

mosami kewat by mosami kewat
March 12, 2026
in क्रीडा, बातमी
0
ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

       

मुंबई : टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर आयसीसी रँकिंग जाहीर झाली आहे. या यादीमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी झेप घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. भारताचा स्टार ओपनर अभिषेक वर्मा हा यादीमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र भारताला वर्ल्ड कप जिंकण्यात महत्त्वाची भूमिका पार पडलेल्या संजू सॅमसन याने क्रमवारीमध्ये मोठी झेप घेत आपल्या करियरमधील सर्वोत्तम स्थान पटकावले आहे. मात्र वरूण चक्रवर्ती याला झटका बसून त्याला आपले पहिले स्थाम गमवावे लागले आहे. वरूण चक्रवर्ती हा आता दुसऱ्या स्थानी गेला आहे. आता पहिल्या स्थानी कोण आहे? जाणून घ्या.

अभिषेक शर्मा ८७५ अंकांसह पहिल्या स्थानावर कायम आहे मात्र फक्त चार धावांनी त्याचे सिंहासन वाचले आहे. कारण भारताचा आक्रमक खेळाडू ईशान किशन याने आपल्या वर्ल्ड कपमधील प्रदर्शनाच्या जोरावर थेट दुसऱ्या स्थानी आला आहे. अभिषेकपासून तो फक्त चार अकांनी मागे राहिलाय. ईशान किशन याने ८७१ अंकांसह दोन स्थानांनी उडी घेतलीय. टॉप १० फलंदाजांमध्ये भारताच्य चार खेळाडूंचा समावेश आहे. यामधील अभिषेक आणि ईशान यांनाच फायदा आहे. मात्र तिलक वर्मा (७२४ गुण) सातव्या क्रमांकावर आला आहे. तर कॅप्टन सुर्यकुमार यादव याला दोन स्थानांचे नुकसान झाले असून तो आता (७२२) गुणांसह नवव्या स्थानावर आहे. (ICC T20 Ranking)

Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

या रँकिंगमध्ये संजू सॅमसन याने सर्वात मोठी झेप घेतली आहे. संजू ६३७ गुणांसह २२ व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्याआधी ६५ व्या स्थानावर असलेल संजू आता ४३ स्थानांनी झेप घेत २२ व्या क्रमांकावर आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसन हा मॅन ऑफ द टूर्नामेंट राहिलाय. संजू सॅमसन याने पाच सामन्यात ३२१ धावा केल्या असून त्याची सरासरी ८०.२५ होती आणि स्ट्राईक रेट २०० होता. तीन धावांनी त्याचे शतक हुकले होते, त्यानंतर सेम फायनल आणि फायनल सामन्यात ८९ धावांवर तो आऊट झाला होता. या स्पर्धेत त्याने २४ षटकार आणि २७ चौकार लगावले. (ICC T20 Ranking)

जालन्यात अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने होळी करून फोटोचे दहन

बॉलिंगमध्ये वरूण चक्रवर्तीने आपले पहिले स्थान गमावले आहे. राशिद खान याने ७५३ अंकांसह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर वरण चक्रवर्ती ७४० अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टॉप १० मध्ये दोनच गोलंदाज असून दुसरा जसप्रीत बुमराह आहे. बुमराहन ७०२ अंकांसह सहाव्या स्थानावर आला असून त्याने एका क्रमांकाने प्रगती केली आहे. (ICC T20 Ranking)


       
Tags: Abhishek SharmacricketCricketUpdatesICCICC T20 Rankings After World CupICCT20RankingsIshanKishanJaspritBumrahRashidKhanSanju SamsonSuryakumarYadavT20CricketT20WorldCupTeamIndiaWorld Cup
Previous Post

Raigad : पनवेल आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांवर सभासदत्वाची सक्ती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

Next Post
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home