Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Raigad : पनवेल आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांवर सभासदत्वाची सक्ती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
March 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Raigad : पनवेल आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांवर सभासदत्वाची सक्ती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       
रायगड : पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांच्या कामकाजासाठी येणाऱ्या अर्जदारांना “धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ, मुंबई” याचे सभासदत्व घेणे बंधनकारक असल्याची नोटीस लावण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीला मिळाल्याने या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे.

नोटीसनुसार संबंधित मंडळाचे सभासदत्व घेतल्याची पावती जोडल्याशिवाय कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले. तसेच आरटीओ कार्यालयातील संबंधित क्लार्क यांच्याशी संवाद साधत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणीही करण्यात आली. (Panvel RTO Auto Taxi Drivers)

यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी स्पष्ट केले की, संबंधित कल्याणकारी मंडळ रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी फायदेशीर ठरावे या उद्देशाने सभासदत्वाबाबत माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोणत्याही चालकावर सभासदत्व घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आलेली नाही. कार्यालयात फलक लावण्यात आले असले तरी चालकांवर दबाव आणू नये, तसेच मंडळाची माहिती आणि त्याचे फायदे समजावून सांगावेत, असे तात्काळ निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळामध्ये पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, प्रवक्ते कुमार मेटांगे, महासचिव अविनाश अडागळे, महासचिव संतोष मुजमुले तसेच रिक्षा युनियन नेते बाळा जगदाळे उपस्थित होते. (Panvel RTO Auto Taxi Drivers)

दरम्यान, कोणत्याही चालकावर जबरदस्ती करून कोणत्याही संस्थेचे सभासदत्व लादणे योग्य नसल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले असून चालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पक्ष सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही सांगण्यात आले.

Tags: MaharashtraRaigadrtoVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

Next Post

ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

Next Post
ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home