Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शहराच्या विद्रुपीकरणाविरोधात युवा वंचित आक्रमक; ABVP वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
March 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शहराच्या विद्रुपीकरणाविरोधात युवा वंचित आक्रमक; ABVP वर गुन्हा दाखल करण्याची मागणी
       
औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (ABVP) शहरात करण्यात येत असलेल्या विद्रुपीकरणाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शहराच्या स्वच्छतेला बाधा पोहोचवणाऱ्या या कृत्याबद्दल संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी युवा वंचितच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

नेमका प्रकार काय?

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांतील भिंतींवर JOIN ABVP आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा आशयाचे मोठे मजकूर रंगवण्यात आले आहेत. यामुळे शहराचे सौंदर्य खराब होत असून स्वच्छ शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप युवा वंचितने केला आहे.

पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक आणि खासगी भिंतींवर अनधिकृतपणे रंगकाम केल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विद्रुपीकरण करणाऱ्या ABVP च्या कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हे नोंदवण्यात यावेत आणि जिथे जिथे भिंती रंगवण्यात आल्या आहेत, त्या पूर्ववत स्वच्छ करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वच्छ शहराचे चित्र या विद्रुपीकरणामुळे बदलत आहे. नियमांचे उल्लंघन करून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. असे युवा वंचित आघाडीकडून मत व्यक्त करण्यात आले आहे.

निवेदन देताना वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष राहुल मकासरे, अभिमन्यू अंभोरे, शहर उपाध्यक्ष निलेश बनकर, रवी मिसाळ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AbvpMaharashtraPoliticalratnagiriVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Digital Scam : रत्नागिरीत परदेशी मैत्रीच्या आमिषाने २२.२१ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Next Post

नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

Next Post
नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home