अकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला येथील जिल्हा पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभांना उपस्थित पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्नाबाई सिरसाठ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी केले होते, तर अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मनकर्ना सिरसाठ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनकर्ना सिरसाठ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि साडी देऊन यथोचित गौरव करण्यात आला. सत्कारातून व्यक्त होताना शिरसाठ म्हणाल्या की, मी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाहिले आहे आणि त्यांच्या सभांना उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला लाभले. आजच्या शोषित-वंचित बहुजन युवकांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पक्षात जोमाने कार्य केले पाहिजे. आंबेडकर परिवाराशिवाय बहुजन समाजाला दुसरा पर्याय नाही.
या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे अनेक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने अनुराधा ठाकरे, शोभा शेळके, मीनाक्षी शेळके, रूपाली गवई, मजहर खान, गजानन गवई, अशोक शिरसाट, सुरेश पाटकर, मनोहर बनसोड, सुनील फाटकर, किशोर जामणीक, गोरसींग राठोड, दिनकर खंडारे, सुमित नवलकर, पराग गवई हे उपस्थित होते. तसेच डॉ. अशोक मेश्राम, प्रा. सुरेश मोरे, मनोहर वानखडे, ॲड. आकाश भगत, विश्वजीत इंगळे, प्रशांत शिरसाठ, सतीश चोपडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेटके संचालन गजानन गवई यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. अशोक मेश्राम यांनी मानले.






