Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 

mosami kewat by mosami kewat
February 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 
       
मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी आज कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनाच्या हक्कभंग समितीसमोर हजर झाले. मात्र, या प्रकरणातील मूळ तक्रारदार भाजप नेते प्रवीण दरेकर अनुपस्थित राहिल्याने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्च रोजी होणार आहे.

नेमका वाद काय?

कुणाल कामरा याने एका स्टुडिओमध्ये ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी’ अशा आशयाचे एक  गीत गायले होते. हेच गीत सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या गीतामुळे मुख्यमंत्र्यांचा अवमान झाल्याचा दावा करत प्रवीण दरेकर यांनी दोघांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. (Kunal Kamra song controversy )

मी संविधानाला मानतोय. आज हक्कभंग समितीसमोर आलो होतो, पण आज सुनावणी झाली नाही. पुढच्या सुनावणीलाही येईन. माझ्यावर जो आरोप ठेवण्यात आला आहे त्यावर मी त्यावेळी उत्तर देईन असे कॉमेडियन कुणाल कामरा म्हणाले. यामधील मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर यांची साक्ष पहिल्यांदा नोंवदली पाहिजे. त्यानंतर आमची बाजू मांडण्यात येईल. आज आमची बाजू का ऐकली नाही याचं उत्तर समिती देईल. (Kunal Kamra song controversy)

हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले की, कायद्याच्या तरतुदीनुसार तक्रारदाराची साक्ष आधी होणे आवश्यक आहे. १० मार्च रोजी प्रवीण दरेकर, कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे या तिघांनाही आमने सामने बोलावून त्यांची साक्ष नोंदवण्यात येईल.

Tags: Eknath ShindeKunal KamraKunal Kamra song controversyMaharashtramumbaiPoliticalSongVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 
बातमी

‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 

by mosami kewat
February 17, 2026
0

मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी आज कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनाच्या हक्कभंग समितीसमोर हजर...

Read moreDetails
अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

February 17, 2026
डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

February 17, 2026
जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल

जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल

February 17, 2026
अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

February 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home