Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

mosami kewat by mosami kewat
February 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप
       
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) ‘डिजिटल पेमेंट्स’ला प्रोत्साहन देण्यासाठी बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ही सुविधा प्रवाशांसाठी सुविधेऐवजी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ऑनलाईन पेमेंटच्या भरवशावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना तांत्रिक बिघाड, स्कॅनिंगमधील त्रुटी आणि पैशांच्या फरकामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (PMPML bus)

अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे की, मशीनवर स्कॅन करताना किंवा ऑनलाईन तिकीट काढताना प्रत्यक्ष भाड्यापेक्षा जास्त रक्कम स्क्रीनवर दाखवली जाते. यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे क्युआर कोड (QR Code) स्कॅन होत नाही. अशा वेळी नेटवर्क नसल्याचे कारण दिले जाते, ज्यामुळे ऑनलाईन पेमेंट करता येत नाही. ऑनलाईन पेमेंट चालत नसल्यामुळे बस वाहक (Conductor) प्रवाशांकडे रोख रकमेचा आग्रह धरतात. डिजिटल व्यवहारांच्या आशेने खिशात रोकड न ठेवणाऱ्या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. (PMPML bus)

तिकीट मशीनमधील बिघाडामुळे प्रवाशांना बसमधून उतरवून देण्याचे किंवा त्यांच्याशी वाद घालण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे  नागरिकांमध्ये प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आम्ही डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देतो, पण जर बसमधील मशीन व्यवस्थित चालणार नसतील, तर आम्ही ऐनवेळी पैसे कोठून आणायचे? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने या तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि प्रवाशांना सुलभ सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Tags: Bus tickitgovernmentMaharashtraOnline paymentOnline ticketpunePune News
Previous Post

जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल

Next Post

अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

Next Post
अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

अमरावती: शिवणगाव येथे 'वंचित बहुजन युवा आघाडी'च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 
बातमी

गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

by mosami kewat
August 22, 2026
0

जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता...

Read moreDetails
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

August 22, 2026
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

August 22, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

August 22, 2026
अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

August 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home