Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल

mosami kewat by mosami kewat
February 17, 2026
in बातमी, राजकीय, सांस्कृतिक
0
जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल
       

औरंगाबाद : “साहित्याचा विचार करताना जो माणूस जातीवाद आणि भेदाभेद मानतो, त्याला साहित्यिक म्हणता येणार नाही. समाजातील या जातीभेदाच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत भूमिका घेतली जात नाही, तोपर्यंत साहित्याला व्यापकत्व येत नाही,” असे परखड मत लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केले. 

‘विद्रोही सांस्कृतिक चळवळी’च्या वतीने रविवारी एन-३ सिडको येथील जिजाऊ सभागृहात नांदेड येथील होणाऱ्या २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत यांच्या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे अध्यक्षस्थानी होते, तर डॉ. संजय मून, डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना लोकनाथ यशवंत म्हणाले की, “भारतीयांच्या डीएनएमधून जात जात नाही आणि लोक आजही आडनावावरून जात ओळखतात, म्हणूनच मी आडनाव लावणे सोडले आहे,” माझ्या लहानपणी वडिलांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मित्र सुटत गेले आणि त्यातूनच कविता सुचू लागली. अमरावतीमध्ये एका वृद्ध मजुराला मालकाकडून मिळणारी अमानुष मारहाण पाहून मी अस्वस्थ झालो आणि त्याचे दुःख शब्दांत मांडले. “जगाचे कल्याण व्हावे आणि प्रत्येकाला दोन वेळचे अन्न मिळावे हीच माझी भूमिका आहे, कारण पोट रिकामे राहिले तर माणसे गुन्हेगार होतात,” असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, महात्मा फुले यांनी साहित्य संमेलनावर लिहिलेले पत्र हेच विद्रोही साहित्याचे सूत्र आहे. जातीचे परिप्रेक्ष्य तोडणे हेच विद्रोही साहित्याचे खरे काम असून, आधुनिक कवितेचे जनक केशवसुत नसून सावित्रीबाई फुले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. संजय मून यांनी लोकनाथ यशवंत यांना ‘आजच्या पिढीचा आवाज’ संबोधले. त्यांच्या कवितेला उर्दू शायरीप्रमाणे उत्स्फूर्त दाद मिळते आणि ती शब्दांपेक्षा अधिक आशयाने खुलते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भारत शिरसाट यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले तर आभार डॉ. वैजनाथ कदम यांनी मानले. या सोहळ्याला पत्रकार साहित्यिक भाऊ भोजने, डॉ.अरुणा लोखंडे, डॉ. कमलाकर गंगावणे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. यशवंत खडसे, संजय वरकड, डॉ. रेखा मेश्राम, अँड. वैशाली डोळस, वा. ना. भालेराव, डॉ. सविता लोंढे, आशा डांगे, डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ. भगवान धांडे, संगीता अंभोरे, मंगल मुन, डॉ सुभाष बागल, सुधाकर निसर्ग, डॉ. द्रौपदी पंदीलवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


       
Tags: aurangabadCast systemConstitutionEquityMaharashtraऔरंगाबाद
Previous Post

अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

Next Post
डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 2, 2026
0

फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत PMOची दखल! मुंबई : फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत सोशल मीडियावरील एका पोस्टची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत केंद्रीय विद्यापीठांकडून माहिती...

Read moreDetails
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home