Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
October 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
       
फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत PMOची दखल!

मुंबई : फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत सोशल मीडियावरील एका पोस्टची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत केंद्रीय विद्यापीठांकडून माहिती मागवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारावरून विद्यापीठांचे विचार स्वातंत्र्य, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील साहित्य आणि शैक्षणिक स्वायत्ततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे Annihilation of Caste, महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी यांसह जात, पितृसत्ता आणि सामाजिक विषमतेवर भाष्य करणाऱ्या विविध पुस्तकांवर आक्षेप घेण्यात आलाय. तसेच या साहित्याला ‘विष’ आणि ‘अँटी-हिंदू प्रोपगंडा’ म्हणून संबोधण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

या पोस्टनंतर पंतप्रधान कार्यालयाने या विषयाची दखल घेतल्याचे आणि केंद्रीय विद्यापीठांकडून संबंधित अभ्यासक्रमांची माहिती मागवण्यात आले. त्यावरून मोठे वादळ उठले आहे. केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून केंद्रीय विद्यापीठांना पत्र पाठवण्यात आल्याचेही समोर आलंय, संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तसेच त्या अभ्यासक्रमांबाबत विद्यापीठांची मते मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत टीका केली आहे. त्यांनी १९८७ मधील ‘Riddles in Hinduism’च्या वादाचा संदर्भ देत आंबेडकरवादी संघटनांच्या भूमिकेची आठवण करून दिली.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, १९८७ मध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँड स्पीचेस’च्या खंड ४ मध्ये समाविष्ट असलेल्या ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या साहित्याच्या प्रकाशनाला शिवसेनेसह इतर उजव्या विचारसरणीच्या राजकीय संघटनांनी विरोध केला होता. त्यावेळी आंबेडकरवादी संघटनांनी या उजव्या विचारसरणीच्या संघटनांविरोधात तीव्र प्रति आंदोलन उभारले आणि त्यांना असा धडा शिकवला, जो ते आजही विसरलेले नाहीत.

ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? असा सवाल त्यांनी केला. 

तसेच देश फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेने चालेल, असे म्हणत त्यांनी RSS आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

ते म्हणाले की, ऐकून घ्या आरएसएस आणि घोंचू मोदी, हा देश फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेने चालेल; गाय, गोबर आणि सावरकरांच्या विचारांनी नाही! हे चांगले समजून घ्या! असं म्हणत आरएसएसला इशारा दिलाय. 

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तके वाचावीत, कोणते विचार अभ्यासावेत आणि कोणत्या साहित्याकडे संशयाने पाहावे, हे ठरवण्याचा अधिकार नेमका कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags: Ambedkar literaturebjpDr Babasaheb AmbedkarMaharashtraMahatma Jotirao Phulemumbainarendra modiPMOPoliticalrssVanchit Bahujan Aghadi
Previous Post

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 2, 2026
0

फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत PMOची दखल! मुंबई : फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत सोशल मीडियावरील एका पोस्टची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत केंद्रीय विद्यापीठांकडून माहिती...

Read moreDetails
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home