उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर महानगरपालिकेत दोन नगरसेवक निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
आशा पवार यांनी निवडून आल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचे आभार मानले आहेत. आगामी काळात उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक यांनी अजून ताकदीने काम करण्याचा निर्धार केला आहे.





