Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
February 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पाठविलेल्या पत्राला अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करण्यासाठी देशव्यापी, कायदेशीर आणि शांततापूर्ण आंदोलन उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी या पत्राद्वारे काँग्रेस पक्षाकडे मांडला होता. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात काही गंभीर व चर्चेतील मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. (Prakash ambedkar)

“जेफरी एपस्टाईन फाइल्स”शी संबंधित ई-मेलमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख झाल्याच्या वृत्तांबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच अमेरिकेसोबत झालेल्या आर्थिक व्यापार कराराबाबतही अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. 

२०२० मधील चीन-भारत सीमावादादरम्यान झालेल्या संघर्षाच्यावेळी केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली नाही, या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधानांनी देशासमोर सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Prakash ambedkar)

विरोधकांनी एकत्र यावे : 

काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी तसेच इतर भाजपविरोधी पक्ष, एससी, एसटी आणि ओबीसी संघटनांसोबत एकत्र येऊन लोकशाही मार्गाने आंदोलन उभारावे, असा प्रस्ताव आंबेडकर यांनी मांडला आहे. (Prakash ambedkar)

राजकीय वर्तुळाचे लक्ष : 

दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाकडून या प्रस्तावावर अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. काँग्रेस पक्ष या मागणीवर काय निर्णय घेतो, याकडे राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात लक्ष लागले आहे.

Tags: CongressEpstein fileGlobalGlobal newsMaharashtramumbainarendra modiPoliticalpoliticsPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

उत्तरप्रदेशात १८ जिल्ह्यांतील न्यायालयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी

Next Post

मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post
मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात
अर्थ विषयक

“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात

by mosami kewat
August 20, 2026
0

- संजीव चांदोरकर  वीस वर्षांपासून अमलात असणाऱ्या ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) च्या जागी मोदी सरकारने “विकसित भारत ग्यारंटी फॉर...

Read moreDetails
माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

August 20, 2026
अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

August 20, 2026
बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

August 19, 2026
कुर्ला एल विभागातील नागरी समस्यांवर स्वप्नील जवळगेकर यांची प्रभारी सहाय्यक आयुक्तांशी भेट

कुर्ला एल विभागातील नागरी समस्यांवर स्वप्नील जवळगेकर यांची प्रभारी सहाय्यक आयुक्तांशी भेट

August 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home