Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

mosami kewat by mosami kewat
February 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला
       
हिंगोली : कळमनुरी येथील विश्रामगृहासमोर (रेस्ट हाऊस) असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात घुसून,  तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर तीन अज्ञात इसमांनी सशस्त्र जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात राजू कांबळे हे थोडक्यात बचावले असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राजू कांबळे हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात एकटेच बसले होते. यावेळी काळ्या कपड्यांमध्ये आलेले आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी अचानक कार्यालयात प्रवेश केला. आत शिरताच त्यांनी प्रथम कांबळे यांचा मोबाईल बाजूला फेकून दिला आणि त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. (Hingoli crime news)

बंदूक आणि चाकूचा वापर

हल्लेखोरांपैकी एकाकडे बंदूक तर दुसऱ्याकडे तीक्ष्ण चाकू होता. हल्लेखोराने बंदूक काढून कांबळे यांच्यावर रोखली आणि गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कांबळे यांनी प्रसंगावधान राखून हल्लेखोराचा हात झटकला, ज्यामुळे बंदूक खाली पडली. त्यानंतर दुसऱ्याने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, तोही त्यांनी रोखून धरला.

राजू कांबळे यांनी आरडाओरड करायला सुरुवात केल्याने आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागले. लोकांचा आवाज ऐकताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या ‘व्हेरना’ (Verna) गाडीतून आले होते. त्यांनी गाडीची नंबर प्लेट  झाकली होती. माझ्यावर हा पूर्वनियोजित जीवघेणा हल्ला करण्यात आला, अशी माहिती राजू कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सध्या राजू कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Hingoli crime news)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. भरवस्तीत  झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोर कोण होते आणि या हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

Tags: HingoliHingoli crime newsHingoli newsMaharashtraVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Aghadivbafotindia
Previous Post

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल साठी आग्रह

Next Post

पालकमंत्र्यांनी अनुसूचित जातीच्या वस्त्यांमधील विकासकामांना दिलेली स्थगिती रद्द करा; वंचित बहुजन आघाडी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित
बातमी

चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित

by mosami kewat
February 13, 2026
0

चाकण : पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी सकाळी एका धावत्या PMPML इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. बसचालक...

Read moreDetails
लोकसेवा विकास आघाडीच्या गटनेतेपदी अफसर खान यांची निवड

लोकसेवा विकास आघाडीच्या गटनेतेपदी अफसर खान यांची निवड

February 13, 2026
पालकमंत्र्यांनी अनुसूचित जातीच्या वस्त्यांमधील विकासकामांना दिलेली स्थगिती रद्द करा; वंचित बहुजन आघाडी

पालकमंत्र्यांनी अनुसूचित जातीच्या वस्त्यांमधील विकासकामांना दिलेली स्थगिती रद्द करा; वंचित बहुजन आघाडी

February 13, 2026
कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल साठी आग्रह

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल साठी आग्रह

February 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home