Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

mosami kewat by mosami kewat
February 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!
       
मुंबई : “एकीकडे भारत विश्वगुरू बनण्याच्या बाता मारल्या जात असताना, प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांचे चेले बनले आहेत,” अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना ब्लॅकमेल करत असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे.

नेमके प्रकरण काय?

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, ट्रम्प यांच्याकडे मोदींच्या अशा काही ‘काळ्या कारनाम्यांची’ माहिती आहे, ज्याचा वापर करून ते भारतावर दबाव आणत आहेत. 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये टोकदार प्रश्न उपस्थित केले आहेत. “मी नरेंद्र मोदींचे राजकीय करिअर संपवू शकतो,” असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे, ज्यामुळे मोदी घाबरत आहेत? असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोदींच्या कोणत्या ‘काळ्या पत्रिके’मुळे ट्रम्प त्यांना ब्लॅकमेल करत आहेत आणि त्याची शिक्षा संपूर्ण देशाला का भोगावी लागत आहे? अमेरिकेच्या दबावाखाली येऊन मोदी सरकार देशाच्या हिताशी तडजोड करत आहे का? असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

विश्वगुरू बनायला निघाले होते, पण ट्रम्पचे चेले बनले! मोदींचे असे कोणते ‘काळे गुपित’ ट्रम्प यांना माहित आहे? मोदीजी, देश उत्तर मागत आहे! असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटर  पोस्ट करत सवाल केला आहे. 

पंतप्रधान मोदी आणि भाजपवर करण्यात आलेल्या या थेट आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे ट्रम्प यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांकडून मोदींवर टीका केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला असून, भाजपकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Tags: americabjpdonald trampDonald Trump and narendra modi controversyEconomicsindiaMaharashtranarendra modiPoliticalPrakash Ambedkar
Previous Post

शेगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा!

Next Post

बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home