नांदेड : आज देशभरात माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना, नांदेड जिल्ह्यात मात्र या उत्सवाला प्रशासनाकडून अडवणूक केली जात आहे. शहरात विविध मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने वातावरण तापले आहे.
नेमकी घटना काय?
माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहराच्या विविध भागांतून भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी प्रशासनाने या मिरवणुकांना परवानगी देण्यास नकार दिला. काही ‘जातीवादी’ मानसिकतेच्या व्यक्तींनी या मिरवणुकीला विरोध दर्शवला होता, ज्याचा आधार घेत प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत बंदी घातल्याची चर्चा आहे. (Ramai jayanti)
प्रशासनाच्या या निर्णयामुळे जयंती उत्सवासाठी सज्ज असलेल्या भीम अनुयायांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे सर्वत्र सण-उत्सव साजरे होत असताना, माता रमाईंच्या जयंतीलाच विरोध का? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. हा निर्णय म्हणजे लोकशाही अधिकारांची गळचेपी असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. (Ramai jayanti)
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांनी आक्रमक भूमिका घेत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.






