Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; प्रकाश आंबेडकरांचा RSS वर घणाघाती हल्ला

mosami kewat by mosami kewat
February 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; प्रकाश आंबेडकरांचा RSS वर घणाघाती हल्ला
       

हैदराबाद : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरून आरएसएस (RSS) आणि तेलंगणा सरकारवर संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहे. 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तेल्लापूर येथील महात्मा फुले यांचा पुतळा विद्रुप करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा हल्ला केवळ एका पुतळ्यावर नसून तो सामाजिक समतेच्या विचारधारेवर झालेला हल्ला असल्याचे बोलले जात आहे. (Statue of Mahatma Jyotiba Phule Vandalised in Telangana)

हा ‘मनुवादा’चा पुतळा पाडण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर

या घटनेवर संताप व्यक्त करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी यामागे आरएसएसचा हात असल्याचा म्हटले आहे. आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा केवळ जोतिबा फुलेंवर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. आरएसएसला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो. (Statue of Mahatma Jyotiba Phule Vandalised in Telangana)

पुढे ते म्हणाले, आरएसएसला फक्त मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे. हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवर झालेला आघात आहे. या घटनेनंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना टॅग करत  विचारले की, तुमच्या राज्यात अशा घटना वारंवार का घडत आहेत? तुम्ही हात बांधून गप्प का बसला आहात? (Statue of Mahatma Jyotiba Phule Vandalised in Telangana)

प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे की, हा देश फुले, शाहू आणि आंबेडकरवादी विचारधारेने चालेल, मनुवादाने नाही. तसेच ‘आरएसएस मुर्दाबाद’ आणि ‘मनुवाद मुर्दाबाद’ अशा घोषणा देत त्यांनी आपला निषेध नोंदवला.


       
Tags: MaharashtraPrakash AmbedkarStatue of Mahatma Jyotiba Phule Vandalised in TelanganaTelanganavbaforindia
Previous Post

निवडणूक की थट्टा? आमदार विलास भुमरेच्या अल्पवयीन मुलाने बजावला मतदानाचा हक्क!

Next Post

नांदेडमध्ये रमाई जयंती मिरवणुकांना प्रशासनाकडून बंदी; वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा

Next Post
नांदेडमध्ये रमाई जयंती मिरवणुकांना प्रशासनाकडून बंदी; वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा

नांदेडमध्ये रमाई जयंती मिरवणुकांना प्रशासनाकडून बंदी; वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेड: नगरसेवक गायब, मतदारांवर दबावाचा संशय; विधान परिषद निवडणूक नव्याने घेण्याची प्रशांत इंगोलेंची मागणी
बातमी

नांदेड: नगरसेवक गायब, मतदारांवर दबावाचा संशय; विधान परिषद निवडणूक नव्याने घेण्याची प्रशांत इंगोलेंची मागणी

by mosami kewat
June 17, 2026
0

नांदेड : नांदेड जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार...

Read moreDetails
शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

June 17, 2026
पडेगाव येथील 'कचरा डेपो' हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

पडेगाव येथील ‘कचरा डेपो’ हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

June 17, 2026
ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली

June 17, 2026
‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?

‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?

June 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home