Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

भिंतीपलीकडचा ‘भूतान’

mosami kewat by mosami kewat
August 8, 2026
in article, सामाजिक
0
भिंतीपलीकडचा 'भूतान'

भिंतीपलीकडचा 'भूतान'

       

–विलास रंजना टेकाळे

भूतानच्या ( जी एन एच- ग्रॅास नॅशनल हॅपीनेस) ‘सकल राष्ट्रीय आनंद’ संकल्पनेची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने त्या देशाचा जगात आनंदी व सुखी देश असा गौरव केला आहे. भूतान हा अतिशय सुंदर, शांत आणि निसर्गरम्य देश आहे. त्यामुळे भूतान’ देशाविषयी जगभरात अतिशय कुतूहल आहे. त्या कुतूहलातून जगभरातील लोक भूतानला भेट देतात. भूतानची अर्थव्यवस्था बहुतांश पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल अशा सर्व गोष्टी सर्व सुखसोयी भूतान मध्ये माफक दरात उपलब्ध आहेत. 

भारतीयांना भारताबाहेर खूप दूर न जाता जवळच्याच देशातलं सौंदर्य पाहायचं असेल, तर भूतानला नक्की गेले पाहिजे. एकूणच ज्याला हिमालयाची ओढ आहे, सुंदर निसर्ग सानिध्यात शांतपणे चार दिवस राहायचं आहे, त्यांनी जरूर भूतानला भेट दिली पाहिजे. भारतीय नागरिकांसाठी भूतानचा प्रवास अतिशय सोपा आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकत्ता व भारतातील इतर अनेक शहरांमधून भूतानला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे. भारतातील ‘बागडोगरा’ या भूतान बॅार्डर वरील विमानतळापर्यंत किंवा भूतान मधील ‘पारो’ विमानतळापर्यंत विमानाने प्रवास करता येतो. 

रेल्वेने प्रवास करायचा असेल तर भारतातून भूतानमध्ये थेट प्रवेश करणारी रेल्वे लाईन सध्या उपलब्ध नाही, कारण भूतानमध्ये अद्याप कोणतेही रेल्वेचे जाळे नाही. भूतानच्या सीमेवर रेल्वेने पोहोचण्यासाठी पर्यटक न्यू जलपायगुडी या पश्चिम बंगाल मधील रेल्वे जंक्शन पर्यंत रेल्वेने प्रवास करू शकतात. तिथून पुढे रस्ता मार्गाने (टॅक्सी किंवा बसने) भारतातील शेवटचे शहर जयगाव पर्यंत प्रवास करू शकतात. जयगाव हे भारताचे सीमावर्ती शहर आहे, तर त्याला लागूनच ‘फुएंतशोलिंग’  हे भूतानचे प्रवेशद्वार शहर आहे. या दोन शहरांमध्ये एक भलीमोठी भिंत आहे. भिंतीच्या अलीकडे भारत तर पलीकडे भूतान !

भिंतीच्या अलीकडे व पलीकडे प्रचंड फरक आहे. भिंतीच्या अलीकडे भारतीय भूभागावर प्रचंड गर्दी, रहदारी, गडबड गोंधळ, गोंगाट, कर्ण कर्कश आवाज, अस्वच्छता, भरपूर दुकानं, मॉल, टपऱ्या, फूटपाथवर विक्रेते, हातगाड्या तर पलीकडे भूतानच्या भूमीवर कसलीही गडबड, गोंधळ, गर्दी, आवाज नाही. सगळीकडे शांतता व कमालीची स्वच्छता ! भारत व भूतान मधील हा फरक आपल्याला लगेचच जाणवतो. 

भिंतीच्या पलीकडे भूतानमध्ये प्रवेश करण्यासाठी जयगावमधून चालत फुएंतशोलिंगच्या ‘इमिग्रेशन ऑफिस’ मध्ये जाऊ शकता. फुएंतशोलिंग येथील इमिग्रेशन ऑफिसमधून तुम्हाला भूतानमध्ये पुढे जाण्यासाठी (प्रवेश परवाना) घ्यावा लागतो. भारतीय नागरिकांना भूतानसाठी व्हिसाची गरज नसते, परंतु ‘एंट्री परमिट’ घ्यावे लागते.हे परमिट तुम्ही फुंटशोलिंग (भारत-भूतान सीमा) किंवा पारो विमानतळावर पोहोचल्यानंतर मिळवू शकता किंवा ऑनलाइन अर्ज करू शकता. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जवळ बाळगणे गरजेचे आहे.  भारतीय नागरिकांसाठी मूळ पासपोर्ट (कमीत कमी ६ महिने व्हेलिडिटी असलेला) किंवा मूळ मतदार ओळखपत्र (व्होटर आय डी), पासपोर्ट साईज फोटो, आणि हॉटेल बुकिंगची कागदपत्रे जवळ असणे बंधनकारक आहे. मुलांसाठी जन्माचा दाखला आणि शाळेचे आयकार्ड आवश्यक असते. भूतान मध्ये आधारकार्डवर प्रवेश दिला जात नाही.

भूतान सरकारने पर्यटनासाठी शाश्वत विकास शुल्क लागू केलेले आहे. भारतीय पर्यटकांसाठी हे दर : प्रत्येक व्यक्तीला , प्रति रात्र ₹ १,२२० रुपये आहे . पर्यटक साधारणपणे ७ व जास्तीत जास्त १४ दिवस भूतान मध्ये राहू शकतात. पण त्यासाठी जेवढे दिवस रहाल त्याचे हॅाटेलचे बुकींग व शाश्वत विकास शुल्क अगोदर भरावे लागते. फुंटशोलिंग येथे इमिग्रेशन झाल्यानंतर संपूर्ण प्रवासात तुम्हाला एक गाईड व ट्रॅव्हल्सची गाडी व ड्रायव्हर घेणे बंधनकारक असते. हे तुम्हाला अगोदरच बुकिंग करावे लागते. फुंटशोलिंग सोडल्यानंतर भिंतीच्या पलीकडे असणारा  आगळावेगळा भूतान देश तुम्हाला पहायला मिळतो.

सुंदर नयनरम्य निसर्ग, उत्तम रस्ते,रस्त्यावर एकही खड्डा नाही , वायू व ध्वनी प्रदूषण नाही, सगळीकडे शांत आहे. तिथं एकही टू व्हिलर नाही, प्रदूषण नाही, लोकसंख्या कमी, प्रत्येकाकडे चारचाकी गाडी, एकसारखी तीन मजली छान पेंटिंग केलेली घरं, मोकळे फूटपाथ, रस्त्यावर कागदाचा कपटा नाही, की कुणी थुंकून घाण केलेली नाही. सर्व पाहून मन थक्क होऊन जातं.
निसर्गरम्य, हिरव्यागार डोंगर दऱ्यातून वाट काढीत तुम्ही थिंपूला पोहोचता. थिंम्पु ही भूतानची राजधानी. भूतानचा राज्यकारभार येथूनच चालतो. 

थिम्पु शहर डोंगर उतारावर वसलेले आहे . डोंगरउतारावरची एकसारखी सुबक घरे थिंम्पु शहराची शोभा वाढवतात. राजाचा जुना राजवाडा सध्या सरकारी कार्यालयांसाठी दिलेला आहे. संध्याकाळी ६ नंतर रंगीत दिव्यांची रोषणाई केली जाते. त्यावेळी पर्यटकांना राजवाड्यात फिरण्याची परवानगी असते. यावेळी गाईड फार आवश्यक असतो .

भूतानचा राजा त्याच्या पारंपरिक छोट्याशा घरातच अगदी सामान्यांसारखा राहतो. हि गोष्ट सर्व भूतान वासियांना अतिशय अभिमानाची वाटते. थिंम्पु मध्ये एका उंच टेकडीवर बुद्धाचा  पुतळा आहे. बुद्ध दोर्डेनमा (Buddha Dordenma): टेकडीवर वसलेली ५१ मीटर उंच सुवर्णमयी बुद्ध मूर्ती आहे. येथून थिंफू शहराचा सुंदर असा नजराणा दिसतो. शहरात कुठूनही हा पुतळा दिसतो. जणू काही त्यांच्या देखरेखीखाली शहराचा कारभार सुरू आहे असं वाटतं.

थिंम्पु मध्ये ताशीचो झोंग हे भूतानचे प्रशासकीय केंद्र आणि भव्य वास्तू आहे. तर सिमतोखा झोंग भूतानमधील सर्वात जुना किल्ला आहे. थिंम्पु मध्ये मोथितांग टाकिन प्रिजर्व हे ठिकाण भूतानचा राष्ट्रीय प्राणी ‘टाकिन’ (Takin) पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. थिंम्फु शहरात मोठी बाजारपेठ असून मोठमोठे मॅाल, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स यामुळे पर्यटकांची सायंकाळी तेथे रेलचेल असते.  
थिंम्पु नंतर भूतान मधील महत्वाचे शहर म्हणजे पुनाखा ! १९५५ पर्यंत पुनाखा हीच भूतानची राजधानी होती. नंतर ती राजधानी थिंम्फुला आली.
 
थिंम्फु वरून पुनाखाला जाताना वाटेवर ‘दोचुला पास’ हे अतिशय रमनिय ठिकाण लागते. या ठिकाणी १०८ स्तूप बांधले आहेत. त्यांना दृक वांग्याल स्तूप म्हणतात. समोरच टेकडीवर एक बुद्ध मंदिर आहे. मधल्या विस्तीर्ण पटांगणावर दरवर्षी डिसेंबरमध्ये उत्सव असतो. ढग आणि धुके यांच्या बरोबरच अंगाला झोंबणारा थंडगार वारा, हलखाच सडा शिंपडावा अशा पावसाच्या सरी व जंगलातल्या झाडांचा चालणारा अविरत खेळ ! हे दोचुला पास या ठिकाणाचे आकर्षण !

या ठिकाणी पर्यटक थोड्या वेळ थांबून तेथील हॅाटेल मधील चहा व कॉफीचा आस्वाद घेतात व पुढे पुनाखाला मार्गक्रमण करतात ! फो छू आणि मो छू या दोन नद्यांच्या काठी सुंदर फळं आणि फुलं देणारं भूतानमधील दुसरं शहर म्हणजे पुनारवा. पुनारवा ही भूतानची थंडीमधील राजधानी होती. पुनाखा येथे ‘पॅलेस ऑफ ग्रेट हॅप्पीनेस’ हे राजाचे हिवाळ्यातले निवासस्थान आहे. पुनाखा झोंग दोन नद्यांच्या (फो छू आणि मो छू) संगमावर वसलेला भूतानमधील सर्वात सुंदर किल्ला पहाण्यासारखा आहे.

पुनाखा सस्पेंशन ब्रिज : भूतानमधील पुनाखा सस्पेन्शन ब्रिज हा १६० ते १८० मीटर लांबीचा सर्वात लांब लटकत्या पुलांपैकी एक, जिथून नद्यांचा व निसर्गाचा विहंगम देखावा दिसणारा पादचारी पूल आहे, जिथेरंगीबेरंगी प्रार्थना ध्वज आणि वेगाने वाहणारी पो छू नदी यांचे विहंगमय दर्शन घडते. हा पूल ऐतिहासिक पुनाखा झोंग परिसराला शेनाना, सामडिंगखा आणि वांगखा यांसारख्या जवळच्या ग्रामीण गावांना जोडतो.

पारो हे भूतानमधील एक अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि पवित्र शहर आहे. येथे भूतानचे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळ जगातील सर्वात कठीण आणि सुंदर लँडिंग क्षेत्रांपैकी एक मानले जाते. या विमानतळावर लॅंडीग व उड्डाण करताना वैमानिकाचे कौशल्य पणाला लागले जाते. पारो येथे प्रसिद्ध टाइगर नेस्ट मठ (टाकतसांग), आणि पारो जोंग हे प्रमुख आकर्षण आहेत. 

टाइगर नेस्ट मठ भूतानच्या वरच्या पारो खोऱ्यात समुद्रसपाटीपासून ३,१२० मीटर उंचीवर एका उंच कड्याला लागून असलेला एक पवित्र बौद्ध मठ आहे. १६९२ मध्ये बांधलेल्या या मठात ३ ते ४ मैलांची येण्या-जाण्याची पायवाट आहे. टायगर नेस्ट मठाकडे जाणारा हा मार्ग अतिशय खडतर आहे. टायगर नेस्टला पोहोचल्यावर भूतानला आल्याचे सार्थक होते आणि एक आत्मिक समाधान मिळते.
पारो जोंग १६४४ मध्ये बांधलेला हा किल्ला भूतानी वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 

नॅशनल म्युझियम, पारो जोंगच्या वर असलेल्या जुन्या टेहळणी मिनारीमध्ये हे संग्रहालय आहे, जिथे जुन्या वस्तू आणि कलाकृती जतन करून ठेवल्या आहेत. 
भूतान मधील ही  सर्व ठिकाणे पहात असताना तुमचे परमिट काढलेले सात दिवस कधी संपून जातात हे कळत नाही. मग वेध लागतात भारतात परतण्याचे पण तरीही भूतानचा निरोप घेताना मनाला हुरहूर लागते. आनखिन काही दिवस थांबलो असतो तर ……

७०% जमीनीवर वृक्ष लागवड केलेला व विपूल नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला, जगातील एकमेव कार्बन निगेटिव्ह असलेला, बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित वाटचाल करणारा भूतान देश सोडताना, जगाच्या पुर्नमांडणीचा बुद्धांनी मांडलेला विचार भिंतीच्या पलीकडे भूतानमध्ये आहे, तो भिंतीच्या आलीकडे जगभर पोहोचला पाहिजे. ती आजच्या काळाची गरज आहे असे वाटते.


       
Tags: bhutanBhutan The Land of Happiness Nature and PeaceBhutan TourismBhutan TravelGNHGross National HappinessHappinessHimalayasLand Of HappinessNatureParoTravel Bhutan
Previous Post

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भिंतीपलीकडचा 'भूतान'
article

भिंतीपलीकडचा ‘भूतान’

by mosami kewat
August 8, 2026
0

-विलास रंजना टेकाळेभूतानच्या ( जी एन एच- ग्रॅास नॅशनल हॅपीनेस) ‘सकल राष्ट्रीय आनंद’ संकल्पनेची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने त्या...

Read moreDetails
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे 'मंडल विजय दिवस' उत्साहात साजरा

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा

August 8, 2026
८५० खासदारांची संसद : लोकशाहीचा विस्तार की जमावतंत्राचा प्रयोग?

८५० खासदारांची संसद : लोकशाहीचा विस्तार की जमावतंत्राचा प्रयोग?

August 8, 2026
साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘मंडल आयोग विजय दिवस’ उत्साहात साजरा

साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘मंडल आयोग विजय दिवस’ उत्साहात साजरा

August 8, 2026
सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न

सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न

August 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home